चिखली प्रतिनिधी मन्सूरशहा दै. खोज मास्टर न्यूज.दि.२०/०८/२०२३—–जिल्हा न्यायालयात ई फाइलिंग यंत्रांना कार्यान्वित झाली असून आता ऑनलाईन प्रकरण ने दाखल करता येणार असून. न्यायालयीन कामकाज पेपरलेस होण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल आता बुलढाण्यात उतरण्यात आले असून १९ ऑगस्ट पासून जिल्हा व सत्र न्यायालयात ई- फायलिंग फॅसिलिटी सेंटर कार्यरत करण्यात आले आहे. औपचारिक स्तरावर या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून टप्प्याटप्प्याने तालुकास्तरावरील असे केंद्र सुरू करण्यात येणार आहे शनिवारी सकाळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल खटी महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अँड. आशिष देशमुख जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एडवोकेट विजय हिम्मतराव सावळे यांच्या प्रमुख उपस्थित केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून उच्च न्यायालय व महाराष्ट्र गोवा वकील संघाच्या पुढाकाराने केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे यासाठी प्रमुख जिल्हा न्यायालय ही फायलिंग फॅसिलिटी केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे या केंद्राच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्यात करता येतील यासाठी जिल्हा सामान्य म्हणून अँड.सौरभ ढगे आणि तांत्रिक म्हणून प्रदीप शिंदेची नियुक्ती करण्यात आली आहे.
Users Today : 59