दहीहंडीत गॅलरी कोसळुन 1 मुलगी ठार,तर१ गंभीर

Khozmaster
1 Min Read

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी देऊळगाव.राजादहीहंडी साठी बांधलेल्या दोरीसह गॅलरी कोसळून झालेल्या अपघातात एक चिमुकली जागीच ठार तर दुसरी गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.७) रात्री आठच्या सुमारास शहरातील मानसिंग पुरा येथे घडली.

जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीसाठी बंद अवस्थेत असलेल्या एका घराच्या गॅलरीवर दोर बांधण्यात आली होती. सदर दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा वर चढले होते. दहीहंडी बांधलेल्या दोर ला युवक लटकले त्यावेळी सिमेंटच्या पिलर सह लोखंडी गॅलरी खाली कोसळून दुर्घटना घडली. या दुर्घटनेत खाली उभे राहून दहीहंडी पाहणाऱ्या निदा रशीद खान पठाण वय ९ वर्ष ही चिमुकली जागीच ठार झाली.तर अल्फिया शेख हाफिज वय ८ तिच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली. प्रथमोपचार नंतर अल्फिया हिला जालना येथे हलविण्यात आले तर मृतक निदा पठाण हिस ग्रामीण रुग्णालयात पोस्टमार्टम साठी हलविण्यात आले होते. जन्माष्टमीनिमित्त दहीहंडीच्या कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *