मन्सूर शहा दै खोज मास्टर न्यूज.— धोत्रा भंनगोजी कार्यालय येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती त्या ग्रामसभेचे अध्यक्ष गावातील प्रतिष्ठित नागरिक मा श्री शेख.गाणी. शेख.मुसा. बागवान यांची सर्वांनु मते अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली . विशेष ग्रामसभेची सूचक मन्सूरशहा सरदार शहा हे होते तर अनुमोदक म्हणून प्रवीण बापू देशमुख यांनी सहमती दर्शवली. नियमाप्रमाणे विशेष ग्रामसभेला सुरुवात करण्यात आली त्यामध्ये ठराव क्रमांक एक महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण व पारदर्शकता सोसायटी मंत्रालय मुंबई अंतर्गत येणारे सर्व विषय ग्रामसभेमध्ये निकाली काढण्यात आले असून. १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर पर्यंत ग्रामपंचायत धोत्रा.भंनगोजी येथे रोजगार रोजगार हमी अंतर्गत येणाऱ्या कामाचे अंकेक्षण सुरू होते आणि त्यांचे अंकेक्षणाची ही विशेष ग्रामसभा लावण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये या अंतर्गत येणारे सर्व विषय गावकऱ्यांच्या समोर मुद्देसूदपणे वाचन करून प्रत्येक मुद्द्याचे निराकरण करून ग्राम रोजगार सेवक व ग्रामसेवक यांच्या जबाबदारीने हे विषय सर्व निकाली काढून सर्व मुद्दे खारीक करण्यात आले असून सर्व ठराव सर्वांमध्ये मंजूर करण्यात आले आहे. या ग्रामसभेमध्ये गावकऱ्यांनी भरपूर प्रमाणात हजेरी लावली आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत सरपंच गुलाबसिंग रामसिंग सोनारे, सचिव डुकरे साहेब, ग्रामपंचायत सदस्य, प्रशांत कापसे, प्रसाद काळे, संदीप सर, उन्हाळे, परविन बापू देशमुख, सलीम खान अमीर खान पठाण, गजानन इंगळे, गणेश कुसळकर, शरीफ मामू, बागवान, मन्सूर शहा पत्रकार, विवेक पवल, अमोल निकम, बबन चव्हाण, महादू गवई, तसेच भरपूर प्रमाणात गावकरी उपस्थित होते.
Users Today : 59