जलजीवन योजना ठरते डोकेदुखी अंजनी गावचा ठराव जल जीवन चे काम बंद करा…

Khozmaster
2 Min Read

कार्यालय प्रतिनिधी अंजनी बुद्रुक येथे सुरू असलेल्या जल जीवन कामाच्या खोदकाम ग्रामस्थांसाठी त्रासदायक ठरत आहेत. अंजनी गावातील रस्त्यांची कमालीची दुर्दशा होत असून कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासन योजनेच्या जलजीवन मिशन अंतर्गत अंजनी बुद्रुक गावामध्ये अंदाजे सात कोटी रुपयांचे काम सुरू आहे. काम प्रगतीपथावर असताना कंत्राटदाराच्या मनमानीमुळे अनेक रस्त्यात खड्डे निर्माण झाले असून गावातील अंतर्गत वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. रस्त्याच्या मधोमध अनेक वाहने फसली असतात. लोक चर्चेनुसार जल जीवन योजनेतील कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून नियमानुसार कोणत्याही प्रकारचे काम होत नाही. शासकीय टेंडर मध्ये नमूद असल्यानुसार काम होत नसल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. त्याचप्रमाणे गावकऱ्यांना होत असलेल्या सतत अडचणीमुळे ग्रामपंचायत च्या वतीने काम बंद करण्याचा ठराव सुद्धा याबाबत पारित करीत असल्याची माहिती ग्रामसेवक यांनी दिली आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागातील अधिकारी मालोकर यांच्याशी संपर्क केला असता ग्रामपंचायत कडून अशा प्रकारचा कोणताही ठराव आला नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अशा प्रकारचा ठराव प्राप्त झाल्यास तात्काळ काम बंद करण्याचे आदेश देण्यात येईल असे सुद्धा यावेळी त्यांनी सांगितले. शासनाकडून 100 कोटी रुपये मेहकर तालुक्यासाठी जल जीवन योजनेअंतर्गत गाव तेथे पाणी सुविधा प्राप्त करून पाणीटंचाई दूर करण्याचा मानस आहे. शासनाच्या या योजनेला अनेक गावात तिलांजली अंजनी सह अनेक गावात अशा प्रकारच्या तक्रारी दाखल झाले आहेत. परंतु राजकीय बळापोटी सर्वसामान्य ग्रामस्थ चुकीची भूमिका घेत आहेत. धन दांडग्या लोकांना जल जीवन च्या कामाचा वाटप करून अधिकारी पुढारी यांच्या दंडकेशाही पुढे कोण टिकणार हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. जल जीवन प्रकरणात यापूर्वी सुद्धा अनेक गावांमध्ये शासनाच्या नाव बदलून आलेल्या या योजनेसमान अनेक योजना राबवल्या गेल्या तरीसुद्धा मेहकर तालुक्यातील अनेक गावात आणलेलीच आहेत. कोट्यावधी रुपयाच्या कामाच्या तक्रारी होऊन सुद्धा चौकशी आज ताकात थंड बसतात पडलेली आहे. अधिकाऱ्यांना चौकशी करण्याची मानसिकता असली तरी सुद्धा संबंधित कंत्राटदार पुढाऱ्यांचे निकटवर्ती असल्यामुळे त्यांचे लागेबांधे दाट आहेत म्हणूनच आज मी तिला सुद्धा कोणत्याही कंत्राटधारावर कोणत्याही प्रकारची कारवाई तथा रिकवरी झालेली नाही. असे असल्यामुळे मेहकर मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात अशा प्रकारचे चित्र बघावयास मिळते. अंजनी ग्रामस्थांनी केलेला या कामाचा विरोध कितपत टिकतो हे येणारा काळच ठरवेल.

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *