मेहकर : जागतिक महिला दिनानिमित्त कवी संमेलन व कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

KHOZ MASTER
1 Min Read

मेहकर प्रतिनिधी :

येथील जिजाऊ नगर परिसरात भगवान राईतकर यांच्या ‘विष्णुमय’ निवासस्थानी ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या वतीने ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात भव्य कवी संमेलन तसेच विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ८ कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात येणार आहे.
कवी व कवयित्रींसाठी आवाहन
मेहकर व लोणार तालुक्यातील कवी व कवयित्रींनी या कवी संमेलनात सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामनाथ एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष, पत्रकार तथा लेखक भगवान राईतकर आणि साहित्य जगत मासिकाचे कार्यकारी संपादक रामदास राजेगावकर यांनी केले आहे.
महिला विशेषांकाचे प्रकाशन
या कवी संमेलनाच्या निमित्ताने साहित्य जगत या मासिकाचा कर्तृत्ववान महिलांच्या जीवनप्रवासावर आधारित महिला विशेषांक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात येणार आहे.
सहभागाची नोंदणी
कवी संमेलनात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवी आणि कवयित्रींनी आपल्या कविता रामदास राजेगावकर यांच्या 9420233032 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवाव्यात. पाठवलेल्या कविता कवी संमेलनात सादर करणे बंधनकारक राहील.
महिला सन्मान, साहित्यिक अभिव्यक्ती आणि सामाजिक जाणीव यांचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम मेहकरच्या सांस्कृतिक जीवनात एक महत्त्वपूर्ण ठरणार आहे

0 9 3 7 5 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *