दोषींवर कारवाई करा; राजकीय व जातीय रंग देऊ नका : आ. सिद्धार्थ खरात

KHOZ MASTER
2 Min Read

मेहकर, दि. २५ (प्रतिनिधी)
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा इतरत्र हलवू नका, यावर ठाम भूमिका घेणाऱ्या चिखला येथील आमच्या भगिनी शिवसेनेच्या कार्यकर्त्या संजीवनी वाघ यांच्यावर व त्यांच्या कुटुंबियांवर गावातील काही विकृत प्रवृत्तीच्या लोकांनी व महिलांनी हल्ला केला. तिला बेदम मारहाण केली. त्या सर्व आरोपींवर कडक कारवाई करा, कायदेशीर गुन्हे नोंदवून त्यांना अटक करा, अशी मागणी आमदार सिद्धार्थ खरात यांनी केली. तसेच या घटनेला राजकीय रंग देऊ नका, असे आवाहनही केले.
चिखला येथील घटनेच्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की, जोपर्यंत सर्व दोषींना अटक होत नाही, तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही, असा पवित्रा सर्वात अगोदर शिवसेना (उबाठा) ने घेतल्यानंतर रात्री काही लोकांना
अटक झाली. आजपर्यंत जवळपास ३६ लोकांना अटक करण्यात आली. मात्र अजूनही ज्या दोषींना अटक केले नाही, त्यांना अटक करावे, अशी मागणी आमची पहिल्यापासून आहे. ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाला काही लोक राजकीय रंग देत जातीय द्वेष पसरविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. आधीच गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. या
घटनेसंदर्भात दोषी नसणारे लोकही यात भरडल्या जात आहेत. म्हणून बाहेरून आलेल्या लोकांनी जातीय व राजकीय रंग या प्रकरणात आणू नये, असे आवाहन आ. सिद्धार्थ खरात यांनी केले.
संजीवनी वाघ यांच्यासोबत आम्ही पहिल्या दिवसापासून आहोत. झालेल्या अन्यायाविरुद्ध विधानसभेत आवाज उठविणार असल्याचे आ. सिद्धार्थ
खरात यांनी या वेळी सांगितले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, पोलिसांनी दोषींवर कार्यवाही करावी, अशी मागणी आ. खरात यांनी केली.
या वेळी मेहकर नगराध्यक्ष किशोर गारोळे, शिवसेना उपाध्यक्ष प्रा. आशिष रहाटे, मेहकर तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, शिवसेना नेते दिलीप वाघ, युवा सेना तालुकाप्रमुख अॅड. आकाश घोडे, उकळी सर्कलप्रमुख अमोल बोरे, अशोक तुपकर, प्राचार्य विश्वनाथ बाहेकर, दिनकर शिंदे, गजानन आरे, परमेश्वर दहातोंडे, जीवन घायाळ यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंनी दिला धीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष दूरध्वनीद्वारे संपर्क करून संजीवनी वाघ यांची विचारपूस केली. संपुर्ण माहिती घेतली आणि एक भाऊ म्हणून आम्ही सोबत आहोत, शिवसेना पक्ष कायम आपल्या सोबत आहे, असा विश्वास आणि आधार दिला

0 9 3 7 5 7
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *