हॉटेल अंबर येथे सुरू असलेल्या अनैतिक व्यापार व जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा नऊ जणांना केली अटक

Khozmaster
2 Min Read

इस्माईलशेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव : पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त व खात्रीशीर माहितीवरून शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांनी त्यांच्या पोलीस पथकासह जवळा रोडवर असलेल्या हॉटेल अंबर येथे मोठ्या सीताफिने छापा मारला यावेळी गोपाळ रामदास निंबाळकर वय 35 वर्षे राहणार भूत बंगला तालुका शेगाव सतीश महादेव कराड 38 राहणार अकोट रोड शेगाव अक्षय ओंकार खंडारे व 28 राहणार म्हाडा कॉलनी शेगाव या तिघांना अनैतिक व्यापार करतानाशेख राजीक शेख खालीक वय 34 वर्षे रा. जोगड़ी फैल, गांव 5. इमान खान रहेमान खान वय 35 वर्षे रा नायगांव ता. जि. अकोला 6 विशाल भानुदास सोलनकर वय 48 वर्षे रा. बाळापुर जि. अकोला 7 शेख वसीम शेख कलीम वय 36 वर्ष रा. इकबाल चौक, शेगांव 8 चंदन बळीराम वाकोडे वय 38 वर्षे रा. जुने महादेव मंदिर, जि. अकोला . 9 कृष्ण नारायण गवई वय 21 वर्षे रा. लालबाबा मंदिराजवळ, खळवाडी यांना पैशाच्या हारजीतवर जुगार खेळताना पोलिसांनी पकडले यावेळी त्यांच्याकडून आक्षेपार्य साहित्य जप्त करण्यात आले आरोपी विरुद्ध शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर 491/ 2023 कलम 3,4,5,7, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम 1956 सह कलम 4,5 जुगार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरात अनैतिक व्यापार करणाऱ्या लॉज चालका मध्ये प्रचंड खळबळ निर्माण झालेली दिसत आहे या कारवाई मध्ये पोलिसांनी नगदी 31 हजार 750 रुपये आठ मोबाईल एकूण किंमत एक लाख सहा हजार रुपये असा एक लाख 39 हजार 520 रुपयांचा जुगार मुद्देमाल अनवांटेड 72 कंपनीच्या दोन गर्भनिरोधक गोळ्या डीलक्स निरोध कंपनीचे 12 कंडोम चे पाकीट वाईट टोन फेस पावडर लहान डबी बॉडी लोशन छोटा बॉक्स इत्यादी मुद्देमाल जप्त करण्यात आला याबाबत अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पीआय सुनील आंबुलकर साहेब करीत आहेत

 

0 9 4 8 1 9
Users Today : 59
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *