शालेय जिल्हास्तर बुध्दीबळ स्पर्धेत मुलीतुन कु.परी चव्हाण व मुलामध्ये सोहम चव्हाण प्रथम*
जि.प.शाळा,खंडाळा चे अभुतपुर्व यश – क्रीडा व युवक सेवा संचालनालय,पुणे,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय जिल्हास्तर बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन दिनांक 4 व 5 नोव्हेंबर 2023 ला क्रीडा संकुल बुलढाणा या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत प्रत्येक तेरा तालुक्यातुन निवड झालेल्या बुध्दीबळ खेळाडूंना प्रवेश देण्यात आले होते. 14 वर्षाखालील मुलींच्या वयोगटात खेळताना आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त बुध्दीबळ खेळाडू कु.परी चव्हाणने एकुण सहापैकी सलग सहा सामने जिंकले. सदर स्पर्धेत अपाराजित राहुन परीने प्रथम क्रमांक मिळविला.तिची अमरावती विभाग शालेय बुध्दीबळ स्पर्धेकरीता निवड झाली आहे. आपल्या उत्कृष्ट व आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत परीने सर्वच खेळाडूना एकतर्फी पराभूत केले. शालेय अमरावती विभागस्तरावर बुध्दीबळ खेळात बुलढाणा जिल्हाचे नाव उंचाविण्याचा मनोदय याप्रसंगी परीने व्यक्त केला. परी चव्हाणने भारतातील अनेक राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत सहभाग नोंदविला असून बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय रेटिंग प्राप्त करणारी जिल्हातील ती एकमेव लहान महिला खेळाडू आहे .परीने बुध्दीबळ या खेळात अनेक पुरस्कार प्राप्त केले आहे.
ती जि.प.शाळा,खंडाळा येथे इयत्ता 6 व्या वर्गात शिकत आहे.
तसेच 14 वर्षाखालील मुलांच्या वयोगटात खेळताना सुध्दा सोहम चव्हाणने एकुण सहापैकी सलग पाच सामने जिंकले व सहावा सामना बरोबरीत राहिला .सदर स्पर्धेत अपाराजित राहुन सोहमने प्रथम क्रमांक मिळविला.त्याची अमरावती विभाग बुध्दीबळ स्पर्धेकरीता निवड झाली आहे. आपल्या आक्रमक खेळाचे प्रदर्शन करीत खेळाडूना सोहमने एकतर्फी पराभूत केले. शालेय अमरावती विभागस्तरावर बुध्दीबळ खेळात बुलढाणा जिल्हाचे नाव उंचाविण्याचा मनोदय याप्रसंगी सोहमने व्यक्त केला. सोहम चव्हाणने भारतातील अनेक राज्य,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत सहभाग नोंदविला असून जलद बुद्धिबळ स्पर्धेतील त्याने आंतरराष्ट्रीय रेटिंग सुध्दा प्राप्त केले आहे व अनेक पुरस्कार सुध्दा प्राप्त केले आहे. तो जि.प.शाळा,खंडाळा येथे इयत्ता 8 व्या वर्गात शिकत आहे.
स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी परी चव्हाणचे बुलढाणा अर्बनचे मॅनेजींग डायरेक्टर सुकेशजी झंवर ,महाराष्ट्र बुध्दीबळ संघटनेचे पदाधिकारी अंकुश रक्ताडे, क्रीडाधिकारी उज्वला लांडगे मॅडम,पंच अमोल इंगळे सर,प्रसाद पत्की सर यांनी परी व सोहमला शुभेच्छा देऊन या यशाबद्यल त्यांचे स्वागत केले.
आपल्या यशाचे श्रेय तो प्रसिद्ध बुद्धिबळ मार्गदर्शक सुरेश चव्हाण, चेतन चव्हाण -प्रसिद्ध बुद्धिबळ मार्गदर्शक,पुणे व आई.सौ.प्रिया चव्हाण यांना तसेच जि.प.शाळा,खंडाळाचे मुख्याध्यापक विनोद ढव्हळे सर , सुदाम राठोड सर,पाटील सर,ताजणे मॅडम,बर्वे मॅडम,गाडगे मॅडम व प-हाड कोचिंग क्लासेसचे अध्यक्ष विनोद प-हाड सर,सौ.स्वाती प-हाड मॅडम,अमोल गोलारे सर यांना देतो.