ज्ञानेश्वर सुपेकर
लोणार- स्थानिक लोणार येथील कै.कु.दुर्गा क.बनमेरु विज्ञान महाविद्यालय लोणार येथे रसायनशास्त्र विभागांमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये प्रथम रसायनशास्त्र प्रयोशाळेचे नविन इमारतीमध्ये स्थलांतरित झाले असुन या विभागाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.प्रकाश क.बनमेरू तसेच डॉ.आर.ई.खडसान प्राचार्य बरुंगले महाविद्यालय, शेगांव त्यासोबतच अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतोष क.बनमेरू यांच्या उपस्थितीत पार पडला.त्यानंतर पोस्टर प्रेसेंटेशन चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये रसायनशास्त्र विभागातील बीएससी प्रथम, द्वितीय,व तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी रसायनशास्त्र मधील विविध विषयांवर सुबक असे पोस्टर तयार करून आणले होते प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत मान्यवरांनी पोस्टर बघून विद्यार्थ्यांची स्तुती केली. यानंतर रसायनशास्त्र मंडळाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले रसायनशास्त्र अभ्यास मंडळ व कार्यकारणी गठित करून फलकाचे अनावरण करण्यात आले.त्यानंतर ग्रीन केमिस्ट्री या विषयावर प्राचार्य डॉ. आर.इ. खडसान सर यांनी विद्यार्थ्यांना स्वतः केलेल्या संशोधनाबद्दल लेक्चरचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू सर तर प्रमुख अतिथी म्हणून अमृत सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ.संतोष क.बनमेरु सर यांनी उपस्थित दर्शवली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रसायनशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सूर्यकांत बोरूळ सर यांनी केले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.संतोष क. बनमेरु यांनी रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या त्यानंतर अध्यक्ष भाषणामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश क. बनमेरू सर यांनी रसायनशास्त्र विषयांमध्ये विविध शाखेमध्ये असलेल्या महत्त्वाच्या बाबी विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या व ग्रीन केमिस्ट्री बाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कमलाकर वाव्हळ तर आभार प्रदर्शन प्रा.शिवशंकर मोरे यांनी केले.यासाठी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.