शेतीच्या पाण्यावरून वाद, रागातून ३ भावांनीच केला भावाचा खून; घटनेनं परिसरात खळबळ

Khozmaster
1 Min Read

शेतातील विहिरीच्या पाण्याच्या वादातून भाऊच भावाच्या जीवावर उठल्याची घटना समोर आली आहे. पाण्याच्या वाटणीवरून भावाने चुलत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना जालना तालुक्यातील मौजपुरी येथे घडली आहे. योगेश बाबुराव डोंगरे असे या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या भावाचे नाव आहे.दोघा भावांमध्ये काल पाण्याच्या वाटणीवरून झालेला वाद गावकऱ्यांनी मध्यस्थी करत मिटवला होता. पण डोक्यात घुसलेला राग मात्र थंडावला नसल्याने रात्री उशिरा बाहेर गावी राहत असलेल्या चुलत भावाने मौजपुरी येथे येऊन तीन भावांच्या मदतीने योगेश डोंगरे यास बेदम मारहाण केली. त्यातच योगेशचा जीव गेला. रागाने बेभान झालेल्या या भावांनी कुठलाच विचार न करता योगेशसह त्याच्या पत्नीलाही मारहाण केली. या मारहाणीत योगेशची पत्नी शिल्पा गंभीर जखमी झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *