भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी श्री रेणुका माता देवी मंठा
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना जिल्ह्यातील मंठा शहरात येथे निसर्गरम्य अश्या ठिकाणी वसलेली श्री रेणुकामाता देवी तसेच परिसरातील भाविक भक्ताचे आराध्य दैवत असलेली श्री रेणुकामाता देवी तिला जगदंबा देवी म्हणून संबोधतात. येथे अतिप्राचीन असलेले श्री रेणुकामाता देवी मंदिर परिसरात सर्व भाविक भक्ताचे दैवत आहे. नवरात्र उत्सवामध्ये असंख्य भाविक भक्त येथे दर्शनासाठी येतात. लहान थोर सर्व या देवीच्या दर्शनासाठी येतात. नवसाला पावणारी देवी म्हणून जगदंबा देवीकडे पाहिल्या जाते. टोकवाडी रोड या मार्गावरील येथे मंठा येथील .
मंदिराभोवती निसर्ग रम्य परिसर आहे. देवीच्या परीसरात , लक्ष्मी माता, गणेश मंदिर,माता आणुसया मंदिर,शनि मंदिर,
संत रोहिदास महाराज मंदिर.
मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात शाळा, तहसील, कार्यालय,पंचायत समिती कोर्ट,
कुळे नेहमी प्रसन्न वातावरण आसते.
जगदंबा देवी ची रोज
सकाळ संध्याकाळी पुजा आरती होते .
मंदिराच्या परिसरात मंठा पोलिस प्रशासनाने चोवीस तास भावीकासाठी तत्पर सेवा देत असतात.
मोठ्या प्रमाणावर भाविक भक्त जालना, परभणी, बुलढाणा, हिंगोली या जिल्ह्यांतील भावीक दर्शनासाठी येतात. श्री रेणुकामातादेवीची सर्व भाविक भक्तांनी महती जागृत ठेवली आहे.