प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर :– क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने श्री वसंत देसाई स्टेडियम येथे पार पडलेल्या विभाग स्तरीय मैदानी स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी करून राज्य स्तरावर होणाऱ्या स्पर्धेमध्ये झेप घेतली.
विभागीय स्तरावर झालेल्या शालेय मैदानी स्पर्धेमध्ये सावित्रीबाई फुले प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या 19 वर्षे वयोगटातून अंकुश बंडू अत्तरकार याने गोळा फेक मध्ये विजय मिळवून राज्य स्तरावर होणाऱ्या मैदानी स्पर्धेमध्ये त्याची निवड झाली आहे .अंकुश चे सर्वच स्तरातुन कौतुक केले जाते आहे यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय संस्थेच्या अध्यक्षा सौ सपना म्हैसने तसेच संस्थेचे सचिव श्री सचिन ढोणे मु.अ. जे.डी .कंकाळ सर क्रीडा शिक्षक पंजाब ननीर सर,नंदकिशोर इंगळे सर,हर्षल ढोणे यासोबतच आपल्या आई वडील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देतात
Users Today : 11