देशाचे पहिले पंतप्रधान आणि आधुनिक भारताच्या राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.
नेहरूंनी स्वतंत्र भारताच्या उभारणीसाठी दूरदृष्टीने अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबवले—
-
लोकशाही, धर्मनिरपेक्षता व संविधानिक मूल्यांना भक्कम पाया घातला.
-
उद्योग, विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी दृष्टीकोन ठरवून आधुनिक भारताची दिशा निश्चित केली.
-
IIT, IIM, भाभा अणुसंशोधन केंद्र, DRDO, इस्रोची पायाभरणी यांसारख्या संस्थांची निर्मिती करून देशाच्या वैज्ञानिक परंपरेला नवी उंची दिली.
-
शेतकरी, कामगार आणि सामान्य नागरिकांच्या हक्कांसाठी सातत्याने कार्य केले.
-
आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता, सहअस्तित्व आणि प्रगत विचारांचे केंद्र म्हणून भारताची ओळख निर्माण केली.
राष्ट्रनिर्मितीच्या या महान प्रवासात नेहरूंचे योगदान सदैव स्मरणात राहील.
त्यांच्या जयंतीनिमित्त — समता, प्रगती आणि लोकशाहीचे मूल्य जपण्याचा नवा संकल्प.
Users Today : 14