रायरेश्वरावर चालत जाणेही अवघड असताना ट्रॅक्टर न्यायचा कसा, हा प्रश्न होता. परंतु जिद्द आणि इच्छाशक्तीने पेटून उठल्यावर अशक्य गोष्टही साध्य करता येते. याचं उदाहरण या शेतकरी बंधूंनी दाखवून दिले आहे.भोर तालुक्यातील किल्ले रायरेश्वर पठारावर जाण्यासाठी साधी पायवाट देखील नाही. वर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आणि लोखंडी शिडीचा उपयोग केला जातो. ही शिडी तीव्र उताराची असल्याने शिडीवरुन गडावर जाताना आणि येताना भीती वाटत असते. शिडीवरुन पर्यटक, नागरिकांना मोकळे जातानाही दमछाक होत असते. अशा परिस्थितीत रायरेश्वर येथील जंगम या शेतकरी बंधूंनी शेती कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला. तो ट्रॅक्टर चक्क ४ हजार ६९४ फूट उंच किल्ल्यावर नेण्याची किमया केली आहे. हा ट्रॅक्टर वर घेऊन जाण्यासाठी त्यांनी अनोखा जुगाड केला आहे. त्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील रायरेश्वर येथील अशोक रामचंद्र जंगम आणि रविंद्र रामचंद्र जंगम या दोघा शेतकरी बंधूंनी शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर खरेदी केला. परंतु रायरेश्वरावर चालत जाणेही अवघड असताना ट्रॅक्टर न्यायचा कसा, हा प्रश्न होता. परंतु जिद्दी आणि इच्छाशक्तीने पेटून उठल्यावर अशक्य गोष्टही साध्य करता येते. याचं उदाहरण या शेतकरी बंधूंनी दाखवून दिले आहे.बुधवार १८ ऑक्टोबर रोजी खरेदी केलेला ट्रॅक्टर रायरेश्वराच्या पायथ्याशी नेण्यात आला. पायथ्यापाशी असलेल्या लोखंडी अरुंद शिडीवरुन ट्रॅक्टर वर पोहचवणे शक्य नसल्याने त्यांनी पायथ्यापाशी ट्रॅक्टर उभा केला. सोबत आणलेल्या मेकॅनिककडून ट्रॅक्टरचे टायर, इंजिन, मडगार्ड, साठा असे पार्ट ट्रॅक्टरपासून वेगळे करण्यात आले. अवजारे आणि ट्रॅक्टरपासून वेगळे केलेले पार्ट २० ते २५ ग्रामस्थांच्या मदतीने शिडीवरुन लाकडाच्या मेंढी लावून, रस्सीने बांधून डोली करत नेण्यात आले. तसेच ट्रॅकरचा मेन सांगाडा, मागचे टायर आणि इंजिन लाकडाच्या मेंढी लावून डोली करत अगदी हळूवारपणे धोका न पत्करता कडेकपाऱ्यातून अतिशय कठीण परिस्थितीत शिडीवरुन पठाराच्या सपाटावर नेण्यात आला.
Users Today : 18