डॉ. सौरभ संचेती यांच्याकडून उकळली लाखोंची खंडणी ७ ते ८ जणांच्या टोळी, वर गुन्हे दाखल

Khozmaster
2 Min Read

बुलढाणा शहरातील नामांकित डॉ. सौरभ संचेती यांच्याकडून साडेआठ लाख रुपयांची खंडणी उकळल्या ची घटना आठ ते दहा दिवसांपूर्वी घडली असून. या प्रकरणात  गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून. सात ते आठ जणांच्या टोळीवर डॉ. संचेती कडून आठ ते दहा लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा आरोप आहे विशेष म्हणजे या शहरातील काही प्रतिष्ठित लोकांची मुले असल्याची बाब समोर आली असून. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने,साहेब यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत पोलीस यंत्रणेने काही आरोप तिच्या मुस्क्या आवलल्या आहे. डॉ. सौरभ सौरभ संचेती यांना फोनवरून कॅन्सर पीडित रुग्णांना तपासणी करता या अशी फोनवरून विनंती करण्यात आली त्यावर विश्वास ठेवून डॉ. सौरभ संचेती हे विजय वाईन बारच्या बाजूला परिसरात रुग्णाच्या तपासणी करिता गेले असता. त्या ठिकाणी दिशांत नवघरे हा आला व त्यांनी सांगितले की मी कॉल केला होता. त्या घरामध्ये डॉ. संचेती यांनी प्रवेश करतात. आत मध्ये ७ ते ८ अनोळखी, व्यक्ती होते त्यांनी डॉ. संचेती, यांना मारहाण करण्याच्या सुरुवात केली. खिशातील नगदी १० हजार रुपये काढून घेतली तर डॉ. संचेती यांच्या लग्न करून त्यांचा व्हिडिओ काढून आम्ही व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी देत पैशाची मागणी केली. ही घटना तुम्ही कोणी कोणाला सांगितल्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला ठार मारू अशी धमकी दिली .या संपूर्ण प्रकरणी डॉ. संचेती यांनी बुलढाणा शहर पोलीस स्टेशनला येऊन सदर आरोपी, विरुद्ध तक्रार दिली पोलिसांनी घटनेचे गांभीरे ओळखून काही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यामध्ये आरोपी  अजय नागपुरे ,पवन सुरडकर, दिशांत नवघरे ,व इतर अनोळखी पाच आरोपींच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशन येथे ३९५, ३८४, ३८५, ३४९, ३४२, ३२३, ५०६, १२०, बी ,४, २५, ६५, अशा विविध स्वरूपांच्या कलमानुसार बुलढाणा शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *