शेगाव : राष्ट्रीय आरोग्य महामेळाव्याचा समारोप नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराने

KHOZ MASTER
1 Min Read

शेगाव प्रतिनिधी :

संतनगरी Shegaon येथे Ministry of AYUSH यांच्या वतीने आयोजित चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य महामेळाव्याचा समारोप दि. २८ फेब्रुवारी रोजी विशेष नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप शिबिराने होणार आहे. या शिबिरात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केंद्रीय आयुष आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री Prataprao Jadhav यांनी केले आहे.
दि. २५ फेब्रुवारीपासून हा भव्य महामेळावा Shri Gajanan Maharaj Sansthan यांच्या विसावा भक्तनिवास संकल्प परिसरात सुरू असून विविध आरोग्य तपासण्या, सल्लामसलत व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे.
२८ फेब्रुवारी : विशेष नेत्र तपासणी शिबिर
अनुभवी व नामांकित नेत्रतज्ज्ञांकडून डोळ्यांची तपासणी
गरजेनुसार मोफत चष्म्यांचे वाटप
विशेषतः जेष्ठ नागरिक, शेतकरी, कामगार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उपयुक्त उपक्रम
मुंबई व इतर ठिकाणांहून येणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे. गरजू रुग्णांनी वेळेत उपस्थित राहून या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी सांगितले आहे.
केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या पुढाकाराने व पंतप्रधान Narendra Modi यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत आहे. “आरोग्य हीच खरी संपत्ती असून आयुष पद्धतीद्वारे सर्वसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे हा केंद्र सरकारचा संकल्प आहे,” असे त्यांनी नमूद केले.
महामेळाव्यास शेगाव शहर व परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून विविध तपासण्यांमुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

0 9 3 6 2 9
Users Today : 27
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *