राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल मध्ये सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन यांच्याद्वारे क्लस्टर 9 राज्यस्तरावरीय खो-खो च्या स्पर्धासाठी राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूल चे महाराष्ट्रातून सीबीएसई स्कूल मधून बुलढाणा जिल्ह्यातून आयोजनासाठी निवड झाली होती. 17 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर या कालावधीमध्ये राज्यभरातून 13 मुलांची टीम व 9 मुलींची टीम या स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. यामध्ये आत्ममलिक स्कूल शिर्डी येथील मुलांची टीम विजेता झाली व मुलांमधून न्यू बॉम्बे सिटी स्कूल सीबीएसई मुंबई उपविजेता झाली व तिसऱ्या नंबरवर तुळशीबाई रंगलालजी झांबड विद्यानिकेतन स्कूल नांदुरा व मिलीनियम नॅशनल स्कूल पुणे यांचा तिसरा नंबर वर बाजी मारली व मुलीच्या टीम मधून विजेता संघ मिलिनियम नॅशनल स्कूल पुणे हा संघ विजेता झाला व उपविजेता संघ भवन बीपी विद्या मंदिर स्कूल नागपूर व तिसऱ्या नंबर वर न्यू बॉम्बे सिटी स्कूल सीबीएसई मुंबई व आत्मामलिक स्कूल शिर्डी या संघ तिसऱ्या नंबर वर विजेता झाला या स्पर्धेसाठी खो-खो चे विदर्भ असोशियन नागपूर चे पंधरा रेफ्रीज ची टीम हजर होती व या सर्व विजेता संघांना खो-खोच्या स्पर्धा संपताच विजेता टीमला सुवर्णपदक,उप विजेता टीमला रोप्य पदक व तिसऱ्या नंबर वर विजयी झालेल्या टीमला कास्यपदक राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थाध्यक्षा डॉ. मीनलताई शेळके व सचिव डॉ रामप्रसाद शेळके सर,प्राचार्य आदेश शर्मा व रेफ्रिज यांच्या हस्ते पदक वाटप करण्यात आले. सर्व खेळाडूंनी आपापल्या मधील खेळाडू आत्मा या ठिकाणी दर्शवली या ठिकाणी काही कोच ने प्रतिक्रिया दिल्या की जे पदक आम्हाला ताबडतोब या ठिकाणी वाटप करण्यात आले त्यामुळे आमचा सर्व टीमांचा आनंद द्विगिनित झाला व राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे राज्यस्तरीय खो-खोच्या स्पर्धाच्या नियोजनासाठी येणाऱ्या सर्व टीम व कोचेस आणि रेफ्रिज च्या राहण्याची,जेवणाची,ट्रॅव्हलिंग तसेच प्राथमिक उपचार या सर्व गोष्टी वेळेवर व चांगल्या पद्धतीने सर्व व्यवस्थित पार पाडले त्याबद्दल राजलक्ष्मी इंटरनॅशनल स्कूलचे व मॅनेजमेंट चे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फैजल सर यांनी केले. यावेळी पंढरीनाथ भुतेकर, ज्ञानदेव भोसले,रामेश्वर इंगळे, देवेंद्र नरोटे,गणेश पंडित,बाळासाहेब गोजरे, राजेश पंडित, रिकी कांबळे,मंगेश टेकाळे,संतोष राठोड, ज्ञानदेव शेरे, अमोल हरणे, मुकुल गवई,योगेश गवई, रुस्तुम भुतेकर, गणेश जायभाये, तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे देऊळगाव राजा