धरमशाला: विश्वचषक २०२३ मधील गुणतालिकेतील २ अव्वल आणि अपराजित संघ यांच्यामध्ये आज मोठे घमासान रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडमधील हा सामना विश्वचषक स्पर्धेला वळण देणारा सामना ठरणार आहे. या दोन्ही संघांनी विश्वचषक मोहिमेतील एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सामन्याची नाणेफेक झाली असून दोन्ही संघांमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याची नाणेफेक झाली असून भारतीय संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना दुखापतीचा झटका बसला आहे. किवी संघ नियमित कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमुळे या सामन्यातही खेळताना दिसणार नाही, त्याच्याजागी टॉम लॅथम संघाचे नेतृत्त्व करत आहे. तर भारतीय संघात आजच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या जागी संघात एक बदल निश्चित होता. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हार्दिक चेंडू अडवताना त्याचा पाय मुरगळला आणि तो दुखापती झाला. या दुखापतीसाठी त्याला बंगळुरूला जावे लागले आहे.
भारतीय संघात २ बदल झाले आहेत. हार्दिक पांड्या आणि शार्दुल ठाकूर हे दोन खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसणार नाहीत, या दोघांच्या जागी सूर्यकुमार यादव आणि मोहम्मद शमी या दोघांना टीम इंडियात संधी देण्यात आली आहे.
भारत (प्लेइंग इलेव्हन):
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज
न्यूझीलंड (प्लेइंग इलेव्हन):
डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/विकेटकिपर), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट