उत्तर प्रदेश येथील कानपूर ग्रुप मधील ५६ बटालियन एन. सी. सी. झांसी या ठिकाणी उत्तर प्रदेश डायरेक्टटेड यांच्या मार्गदर्शनाखाली “एक भारत श्रेष्ठ भारत” कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. हा कॅम्प ०९ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर पर्यंत ग्रुप कमांडर संदीपपाल सिंग रौटेला व कॅम्प कमांडंट कर्नल एच. एम. प्रींजा यांच्या मार्गदर्शनाने चालला. या कॅम्पमध्ये महाराष्ट्रातील एन. सी. सी. चे अमरावती ग्रुप, संभाजीनगर ग्रुप व नागपूर ग्रुप यांचे एकूण १५० कॅडेट्स तर संपूर्ण भारतातून ६०० कॅडेट्स सहभागी झाले होते. अमरावती ग्रुप च्या अंतर्गत येणाऱ्या अमरावती, यवतमाळ, अकोला, खामगाव व जळगाव बटालियन मधील एकूण ५० कॅडेटनी या कॅम्पमध्ये सहभाग घेतला होता. श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोल्याचा कॅडेट सर्वेश धांडे या कॅडेटने बटालियनचे तसेच महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट अशी कामगिरी या कॅम्पमध्ये केली. अमरावती ग्रुपचे नेतृत्व करत असतांना ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोल्याचा व श्रीमती लक्ष्मीबाई राधाकिसन तोष्णीवाल वाणिज्य महाविद्यालय, अकोल्याचा एन. सी. सी. कॅडेट सर्वेश धांडे याला टग ऑफ वॉर या सर्धेमध्ये कॅम्प कमांडंट कर्नल एच. एम. प्रींजा यांच्या हस्ते रौप्य पदक देऊन सम्मानित करण्यात आले. ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला, श्रीमती एल. आर. टि. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डि. सिकची, एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर, आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल व डॉ. स्वाती दामोदरे यांनी सर्वेशनी मिळवलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्याचा सत्कार केला. कॅडेटच्या या कामगिरी बद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, उपाध्यक्ष इंजि. अभिजितजी परांजपे, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सह सचिव सी. ए. विक्रमजी गोलेच्छा व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी सर्वेशचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

Users Today : 11