बार्शिटाकळी शहरातील स्थानिक संताजी नगर, तेलिपुरा येथे जय जगदंबा नवदुर्गा उत्सव मंडळ व इनरिष फार्मा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य आरोग्य शिबिर व मोफत औषध वाटप संपन्न झाले.
यामध्ये हाडांचे विकार, नाक,कान,घसा, किडनीचे आजार, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार, हृदय रोग, युरालॉजी इत्यादी आजारांवर तज्ञ डॉक्टरांनी मोफत उपचार व मार्गदर्शन केले.
डॉ. आशिष ताले (लॅप्रोस्कोपिक सर्जन व वंध्यत्व निवारण तज्ञ), डॉ.सुमित तुळजापूरे (मुत्रविकार तज्ञ), डॉ. मंदार वाघमारे (अस्थिविकार तज्ञ), डॉ.प्रियांका दंदी (नाक,कान, घसा तज्ञ), डॉ. स्वप्नील लाहोळे (मधुमेह रोग तज्ञ), डॉ. निवृत्ती पातोंड(बालरोग तज्ञ), इनरिष फार्मा चे मॅनेजर स्वप्नील टारगे यांनी रुगांना मार्गदर्शन केले.
नवदुर्गा उत्सव समिती बार्शिटाकळी, नवरात्र उत्सव स्पर्धा निरीक्षक हरिदास रत्नपारखी, तुळशीराम बोबडे, देविदास कावरे, शेषराव राजुरकर, , महादेव कापकर, अनिरुद्ध क्षिरसागर महाराज, डॉ सुधीर बुटे, अनिल म्हस्के,प्रकाश माणिकराव उपस्थित होते.आयोजक जय जगदंबा मंडळ तेलीपुरा नितेश वाघमारे, राधेश्याम हरणे, अरविंद भुजाडे, शुभम राजूरकर,मारुती भगत, विपुल केदारे,अनंतराव केदारे, गजानन गर्दे, यांनी सेवा दिली