जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष यांचा ग्राहक पंचायत व प्रवासी महासंघातर्फे सन्मान..

Khozmaster
2 Min Read
प्रविण चव्हाण
 
नंदुरबार (प्रतिनिधी) येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच अंतर्गत जिल्हा ग्राहक आयोगाच्या अध्यक्षपदी ज्ञानेश्वर प्रसन्ना  आणि सदस्या म्हणून  स्मिता पवार यांची निवड झाली.
   याबद्दल  ग्राहक पंचायत महाराष्ट्राच्या नंदुरबार जिल्हा  आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघ नंदुरबार जिल्हा शाखेतर्फे सन्मान करण्यात आला.
यावेळी नवनियुक्त अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रसन्ना यांनी जिल्ह्यात ग्राहक चळवळ प्रभावीपणे राबविण्यात संदर्भात मार्गदर्शन केले.तर स्मिता पवार यांनी ग्राहकाभिमुख उपक्रम राबवून जनजागृती करणे बाबत सूचित केले.
टोकरतलाव रस्त्यावरील ग्राहक न्याय भवन येथे आयोजित छोटेखानी सत्कार समारंभ प्रसंगी अड. मोहन बोडस, ग्राहक पंचायत नाशिक विभागीय सहसचिव श्रीकांत पाठक,जिल्हाध्यक्ष प्रा.आर.ओ. मगरे,जिल्हा सचिव अशोक सूर्यवंशी, प्रवासी महासंघाचे नंदुरबार तालुका अध्यक्ष महादू हिरणवाळे, उपाध्यक्ष डॉ. गणेश ढोले, निमंत्रित सदस्य बी.डी. गोसावी, ज्येष्ठ सदस्य सुरेश जैन,ऍड निलेश देसाई, ऍड इम्रान पिंजारी, वैभव करवंदकर,तळोदा तालुका अध्यक्ष राजेश चौधरी, प्रा. राजाराम राणे,वासुदेव माळी, गोरखनाथ बावा,आदी पदाधिकारी उपस्थित होते.
त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे नंदुरबार जिल्हा ग्राहक पंचायतची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत ग्राहक पंचायतचे धुळे येथील ज्येष्ठ साधक डॉ. योगेश सूर्यवंशी यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच नंदुरबार जिल्ह्यात 1 ते 22 डिसेंबर दरम्यान सजग ग्राहक अभियान अंतर्गत शाळा, महाविद्यालयात ग्राहक चळवळ प्रबोधन, समस्या, प्रश्न उत्तरे,यावर तालुका निहाय उपक्रम राबविण्यात संदर्भात चर्चा झाली.
 
फोटो कॅप्शन- नंदुरबार जिल्हा ग्राहक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर प्रसन्ना  व सदस्या स्मिता पवार यांचा सन्मान करताना ग्राहक पंचायत महाराष्ट्र  आणि महाराष्ट्र प्रदेश प्रवासी महासंघाचे नंदुरबार जिल्हा
पदाधिकारी.
0 9 3 7 6 6
Users Today : 4
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *