अक्षय गवते देशासाठी शहीद; जाणून घ्या अग्निवीराच्या कुटुंबाला कोणती भरपाई मिळणार? कोणती नाही?

Khozmaster
3 Min Read

महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले अक्षय गवते देशासाठी शहीद झाले आहेत. सियाचीनमध्ये कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावत असताना त्यांना वीरमरण आलं. देशासाठी हौतात्म्य पत्करणारे ते पहिले अग्निवीर ठरलेत.नवी दिल्ली: महाराष्ट्राचे सुपुत्र अक्षय गवते यांना लडाखच्या सियाचिनमध्ये वीरमरण आलं. अग्निवीर असलेल्या अक्षय गवते लाईन ऑफ ड्युटीवर तैनात होते. काराकोरम रेंजमध्ये २० हजार फूट उंचीवर असलेलं सियाचीन जगातील सर्वाधिक उंचीवरील युद्धभूमी आहे. या ठिकाणी सैनिकांना भीषण थंडी आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा सामना करावा लागतो. शत्रू सैन्यापेक्षा इथलं वातावरण सैनिकांची परीक्षा घेतं. मूळचे बुलढाण्याचे असलेले अक्षय गवते देशासाठी शहीद होणारे पहिले अग्निवीर ठरले आहेत.अक्षय गवते यांच्या निधनाबद्दल भारतीय लष्करानं शोक व्यक्त केला. सियाचीनमध्ये अक्षय गवते ऑपरेटर म्हणून कार्यरत होते. गवते यांच्या हौतात्म्यानंतर अग्निवीरांच्या कुटुंबांना मिळणाऱ्या नुकसान भरपाईवरुन वातावरण तापलं आहे. मोदी सरकार जवानाच्या हौतात्म्याचा अपमान करत असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. यानंतर भारतीय लष्करानं ट्विट करुन गवते यांच्या कुटुंबाला दिल्या जाणाऱ्या मदतीची माहिती आकडेवारीसह एक्सवर पोस्ट केली.शहीद अक्षय गवतेंच्या कुटुंबाला किती मदत मिळणार?
– शहीद अक्षय यांच्या कुटुंबियांनी विम्याच्या रुपात ४८ लाख मिळतील.
– कुटुंबाला अग्निवीरानं योगदान केलेल्या सेवा निधीतील (३० टक्के) रक्कम मिळेल. त्यात सरकार तितक्याच रकमेची भर घालेल. त्यावर व्याजही देईल.
– अक्षय गवतेंच्या सेवेचा ४ वर्षांपैकी जितका कार्यकाळ शिल्लक आहे, तिथपर्यंत त्यांच्या कुटुंबाला पैसे मिळतील. ही रक्कम १३ लाखांपेक्षा अधिक असेल.सशस्त्र दल युद्ध कोषातून कुटुंबाला ८ लाख रुपये मिळतील.
– लष्कर पत्नी कल्याण संस्थेतून तात्काळ ३० हजार रुपये मिळतील.
– शहीद अक्षय गवतेंच्या कुटुंबाला एकूण १ कोटी १३ लाखांची मदत मिळेल.सशस्त्र दल युद्ध कोषातून कुटुंबाला ८ लाख रुपये मिळतील.
– लष्कर पत्नी कल्याण संस्थेतून तात्काळ ३० हजार रुपये मिळतील.
– शहीद अक्षय गवतेंच्या कुटुंबाला एकूण १ कोटी १३ लाखांची मदत मिळेल.शहिदाच्या कुटुंबाला कोणते लाभ मिळणार नाहीत?
अक्षय गवते देशासाठी हौतात्म्य पत्करलेले पहिले अग्निवीर ठरले आहेत. लष्करी जवानांना वीरमरण आल्यास त्यांच्या कुटुंबांना अंतिम वेतनासह कौटुंबिक पेन्शन आणि आजीवन सेवा लाभ मिळतो. पण अक्षय गवते यांच्या कुटुंबियांना हे लाभ मिळणार नाहीत. अक्षय गवते अग्निवीर होते. त्यामुळे त्यांचं कुटुंब महत्त्वाच्या लाभांपासून वंचित राहिलं.

नियमित सैनिक, अग्निवीर आणि लाभ
लष्करात सेवा देणाऱ्या सिव्हिल ट्रेनी कर्मचाऱ्याचा एखाद्या अपघातात, दारु पिऊन वाहन चालवत असताना किंवा आत्महत्या केल्यानं जरी मृत्यू झाला, तरी त्याच्या कुटुंबाला पेन्शन मिळते. पण सियाचीनसारख्या अतिशय आव्हानात्मक युद्धक्षेत्रात जीव गमावूनही अक्षय गवतेंच्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारची पेन्शन मिळणार नाही. ही मोठी शोकांतिका असल्याचं माजी सैनिक नवदीप सिंह यांनी एक्सवरील त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

0 8 9 4 5 2
Users Today : 18
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *