मुंबईत एका आठ मजल्यांच्या इमारतीच्या तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीत होरपळून २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, तीन जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.मुंबईतील कांदिवलीमधील पश्चिम साई बाबा नगरमध्ये वीणा संतूर बिल्डिंगमधील ग्राऊंड फ्लोअरला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या दाखल झाल्या होत्या. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले असल्याची माहिती आहे.
कांदिवली मधील पश्चिम साई बाबा नगरमधील वीणा संतूर इमारतीत दुपारी १२ वाजून २७ मिनिटांनी आग लागली होती. ही आग इमारतीमधील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये बिघाड झाल्यानं लागल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं होतं. अग्निशमन दलाच्या एकूण पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्याचं काम सुरु आहे.या आगीच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला असून तीन जखमी झाले आहेत. लक्ष्मी बुरा, राजेश्वरी भराटे आणि रंजन शाह या जखमी झाल्या आहेत. या पैकी लक्ष्मी बुरा या ४५ ते ५० टक्के तर रंजन शाह या ४५- ५० टक्के भाजल्या आहेत. तर, राजेश्वर भराटे यांना १०० टक्के भाजलं आहे. तर, ग्लोरी वालफटी वय ४३ वर्षे आणि जोसू जेम्स रॉबर्ट वय ८ वर्ष या दोघांचा मृत्यू झाला आहे.कांदिवलीतील इमारतीत लागलेली आग ही लेवल १ प्रकारातील होती. जखमींना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून त्यांच्याकडून बचावकार्य सुरु करण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाला माहिती मिळताच तातडीनं अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या होत्या.दरम्यान, कांदिवलीतील पश्चिम साई बाबा नगरमधील वीणा संतूर ही इमारत आठ मजली आहे. या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेल्या आगीची झळ वरील मजल्यांना देखील बसली आहे. आग लागल्यानंतर इमारतीमधील रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण देखील निर्माण झालं होतं. तर, घटनास्थळी गर्दी देखील झाली होती.