नेवासा प्रतिनिधी लखन वाल्हेकर
आज आंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी अविरत लढा देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची भेट घेतली यावेळी नेवासा तालुक्याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी मनोजदादा यांना नेवासा तालुक्यात घोंगडी बैठक घ्यावी असा आग्रह करण्यात आला. यावेळी त्यांनी हा आग्रह, निमंत्रण मान्य केले. तालुक्यात प्रत्येक गावात लवकरच मराठा सेवक निर्माण करा असे स्पष्ट सांगितले. बैठकीचे आयोजनाच्या तयारीला लागा असे स्पष्ट सांगितले. नेवासा तालुक्यात लवकरच मनोज दादा जरांगे यांची घोंगडी बैठक आयोजित केली जाणार तसा एसएमएस सर्व मराठा बांधवांना लवकरच देण्यात येईल. या भेटीवेळी सुरेश पाटील शेटे, संभाजी माळवदे, संतोष काळे, रावसाहेब घुमरे आदी उपस्थित होते.