बकऱ्या चोरटा गुप्त माहिती वरून चिखली पोलिसांच्या ताब्यात!

Khozmaster
2 Min Read
चिखली मन्सूर शहा दैनिक खोज मास्टर न्यूज.–गेल्या महिन्यापासून चिखली तालुक्यात बकऱ्या चोरट्याचा प्रमाण वाढले होते. आणि  चिखली तालुक्यातील पळसखेड दौलत येथील रमेश गायकवाड यांच्या बकऱ्या चोरून नेल्या होत्या. आणि तशी तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती. चिखली पोलिसांनी डीबी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर चोरटे हे नगर जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाल्यावर २१ ऑक्टोबर रोजी चिखली पोलिसांनी सदर आरोपीला मुद्देमाला सह ताब्यात घेतल. आहे.

याबाबत सविस्तर अशी की २७ सप्टेंबर रोजी रमेश रामराव गायकवाड राहणार पळसखेड दौलत तालुका चिखली यांनी पोलीस स्टेशन चिखलीला रिपोर्ट दिला होता की ग्राम पळसखेड येथील त्यांचे शेतातील बकऱ्याचे शेड असून त्यामधून लहान मोठ्या बकऱ्या एकूण ३२, बकऱ्या किंमत अंदाजे ९९ हजार रुपयाची बकऱ्या २७ सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान कोणीतरी अज्ञान चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन चिखली येथे अप क्र. ५८२/२०२३ कलम ४६१ ,३८०  भादवी प्रमाणे २७ सप्टेंबर रोजी , गुन्हा दाखल करण्यात आले. ते सदर गुन्ह्याची संबंधाचे ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलीस स्टेशनचे डीबी पथक तसेच तपास अधिकारी यांना गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध लावनेच्या सूचना दिल्या.  डीबी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन सिंह चव्हाण, पोना अमोल गवळी पोलीस कॉन्स्टेबल राजेश मापारी पंढरीनाथ मिसाळ रोहिदास पांढरे प्रशांत धनगर रूपाली उगले यांनी त्यांच्या गुप्त माहिती दारांच्या आधारे गुन्ह्याबाबत माहिती दिली असता. सदर डीबी पथकाला बकऱ्या चोरणारा हा अहमदनगर येथील असल्याची माहिती मिळाल्यावर. आरोपीच्या शोध कामी अमदनगर येथे जाण्याकरीता पथक तयार करण्यात आले.  सदर पथकांनी अहमदनगर येथे जाऊन आरोपी केशव ताजा भोसले वय २३ वर्ष राहणार सैनिक नगर डेअरी फार्म अहमदनगर येथून ताब्यात घेऊन विचारपूस केली असता. त्याने सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने आरोपीकडून १४ लहान मोठ्या बकऱ्या, बोकड, अंदाजे किंमत ४३ हजार ५०० रुपये व त्याच्या  मोबाइल किंमत अंदाजे २ हजार रुपये असा एकूण ४५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी ला गुन्ह्यात अटक करण्यात आली असून .पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल विकास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल संतोष जाधव हे करीत आहेत.
तसेच आरोपीला डीबी पथकाने मुद्देमाल सह ताब्यात घेतल्याने चिखली पोलिसांच्या पथकाने सर्वत्र कौतुक होत आहे.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *