कर्नल रोहीत चौधरी राहुलजी गांधी यांचे प्रतिनिधी उद्या अग्निविर अक्षय गवते यांच्या कुटुंबीयांना भेट देणार.

Khozmaster
2 Min Read
(प्रतिनिधी ) २५ आॅक्टोबर २०२३, बुलडाणा तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील वीर जवान अक्षय लक्ष्मण गवते(२०) यांना सियाचीन मधील याचीन ग्लेशीअर मध्ये कर्तव्यावर असताना वीरमरण आले. २० ऑक्टोबरच्या रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी रुग्णालयात त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला,त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अक्षय यांच्यावर सोमवारी २३ ऑक्टोबरला सकाळी जन्मगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.
  ३० डिसेंबर २०२२ रोजी अक्षय “अग्नीवीर” म्हणून सैन्यात भरती झाले होते. सियाचीन मधील याचीन  ग्लेशीअर मध्ये ते कर्व्यावर होते.  प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सैनिक रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र २० आॅक्टोबर ला रात्री ११ वाजून ३५ मिनिटांनी त्यांना तीव्र हृदयविकाराचा धक्का आला त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे नेते खा. राहुलजी गांधी व काँग्रेस अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खर्गे यांनी ट्विटर वर श्रध्दांजली अर्पण करत अग्नीवीरांच्या विविध समस्यांवर केंद्रातील सरकारला प्रश्न विचारले होते. उद्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटी माजी सैनिक विभाग चे राष्ट्रीय अध्यक्ष कर्नल रोहीत चौधरी हे अग्निविर अक्षय गवते यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत,  त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरूवार २६ आॅक्टोबर २०२३.
स. ०४.४५ वा. दिल्ली वरून प्रयाण.
स. ०७.०० वा. औरंगाबाद विमानतळावर आगमन.
स.११.०० वा. अग्निविर अक्षय लक्ष्मण गवते यांना काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष मा. खा. मल्लिकार्जुन खर्गे व राष्ट्रीय नेते मा. खा. राहुलजी गांधी यांच्या वतिने पुष्पहार अर्पण करून श्रध्दांजली व शहिदांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट.
दु. ०१.०० वा. बुलडाणा पत्रकार परिषद.
स्थळ : हाॅटेल रामा ग्रँट चे सभागृह बस स्टँड समोर बुलडाणा.
दु. ०१.३० वा. माजी सैनिकां सोबत संवाद.
स्थळ : हाॅटेल रामा ग्रँट सभागृह.
दु.३.०० वा. औरंगाबाद साठी रवाना.
सायं. ०६.४५ वा. औरंगाबाद विमानतळावरून दिल्ली साठी रवाना.
मा. संपादक साहेब
दैनिक……….
आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्धी द्यावी ही विनंती.
आपला
श्लोकानंद डांगे
अध्यक्ष, बुलडाणा जिल्हा काँग्रेस सोशल मिडीया.

 

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *