चिखली मेहकर रोडवरील आमखेड माळखेड फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वडिलांसोबत माहेरहून सासरी येत असलेल्या महिलेचा जागीच मृत्यू झाला. समोरून नशेमध्ये वाहन चालवणाऱ्या चालकाच्या ताब्यातील दुधाच्या महिंद्रा पिकपने कारला जबर धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात कारमधील २२ वर्षीय विवाहित महिला ठार झाली असून दोघेजण जखमी झाले आहेत. सुदैवाने अपघातात दीड वर्षाचा चिमुकला सुखरूप बचावला.
मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यातील एकलारा येथील पुनम राहुल महाळनकर ही विवाहित महिला आपल्या वडिलांकडे सेलू, जिल्हा परभणी येथे माहेरी गेली होती. ११ ऑक्टोबर रोजी रात्री तिच्या वडिलांनी स्विफ्ट डिझायर कार भाड्याने आणली आणि पूनमला सासरी सोडवायला निघाले. मात्र ग्राम एकलव्यापासून केवळ दोन ते तीन किलोमीटर अंतर असलेल्या चिखली मेहकर रोडवरील आमखेड मालखेड दरम्यान रात्री साडेबारा वाजता चिखलीकडून मेहकरकडे भरधाव वेगातील पिकअप वाहनाने कारला धडक दिली.अपघातात कारचा मागील दरवाजा तुटला आणि पुनम गाडी बाहेर पडली. यामध्ये डोक्याला व हाताला मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मात्र पूनमचा दीड वर्षीय मुलगा चिकू हा सुखरूप बचावला. तर सुनील दत्तात्रय रत्नपारखी, सुमित रमेश डायमा (दोघेही राहणार सेलू) यांना किरकोळ मार लागला. कारचालक हनुमंत सुंदरराव काळे हे सुद्धा जखमी झाले आहेत. हनुमान सुंदरराव काळे यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक शैलेश उत्तम यादव याच्याविरुद्ध चिखली पोलिसांनी गुन्हा दाखल करून ताब्यात घेण्यात आले आहे.
माहेरून सासरी जाताना २२ वर्षीय तरुणीवर काळाचा घाला; मुलासमोरच सोडले प्राण
Leave a comment