मनोज जरांगेंच्या सभेसाठी सोन्यासारखं पीक उपटून टाकणाऱ्या शेतकऱ्यांना मराठा बांधवांची खास भेट

Khozmaster
3 Min Read

जालना: अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे १४ ऑक्टोबर रोजी मनोज जरांगे यांची विराट सभा झाली होती.या सभेच्या जागेचे नियोजन करण्यासाठी १७० एकर परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात आलेले सोयाबीन व कपाशी सह लावलेली पिके उपटून सभेसाठी मैदान तयार करून दिले होते.अर्थात हातातोंडाशी आलेलं पीक उपटून फेकताना त्यांनी कुठलाच विचार केला नाही विचार केला तो समस्त मराठा बांधवांसाठी आरक्षणाचा.या सभेला लाखोच्या संख्येने आलेल्या जनतेने सोयाबीन,कपाशीचे उभे पीक तुडवून सभेची जागा गाठली.सभा तर निर्विघ्न पार पडली पण गरीब बिचाऱ्या शेतकऱ्यांचे हातचे पीक गेले. त्यांची ही अवस्था गावकऱ्यांना पहिली जात नाही.अश्यावेळी घनसावंगी तालुक्याच्या गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर पुढे सरसावले असून आपल्या शेतातील पिके मोडून जागा दिली,अशा शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी दहा क्विंटल गहू बियाणे व २१ बँग सरकी पेड घनसावंगी तालुक्यातील गुंज येथील शेतकरी गजानन साळीकराम तौर यांच्याकडून देण्यात येणार आहे.ज्या काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील खरिपाचे पिके काढून शेतजमीन दिली. अशा शेतकऱ्यांना फुल ना फुलाची पाकळी म्हणून गुंज येथी शेतकरी गजानन तौर यांच्या वतीने शेतकऱ्यांना रब्बीची पेरणीसाठी १० क्विंटल गहू बियाणे ५५ बॅग व बैलासाठी २१ बॅग पेंड स्थानिक कमिटीकडे जमा करण्यात आली असून कोणकोणत्या शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले ते कमिटी बघेल व त्या शेतकऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांच्यामार्फत देण्यात येणार आहे.आपणही समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून तौर यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मराठा आरक्षणासाठी कंबर कसलेल्या मराठा बांधवांची ही भावना वाखाणण्याजोगी असून परिसरात त्यांच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवर्गातील कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षणाचा निर्णय मंगळवार २४ ऑक्टोबरपर्यंत जाहीर न झाल्यास २५ ऑक्टोबरपासून अंतरवाली सराटी येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार आहे. ‘राज्यात सर्कलनिहाय; तसेच मोठ्या गावांमध्ये साखळी उपोषण, प्रत्येक गावांत कँडल मार्च असा आंदोलनाचा पहिला टप्पा असेल. पहिल्या टप्प्यातील आंदोलन सरकारला झेपणार नाही आणि २८ ऑक्टोबरला त्या पुढचा टप्पा मी जाहीर करणार असून, तो सरकारला अजिबात पेलवणार नाही,’ असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी सरकारला दिला.जरांगे पाटील म्हणाले, ‘मी २५ ऑक्टोबरपासून सुरू करणाऱ्या बेमुदत उपोषणात पाणी आणि वैद्यकीय उपचारही घेणार नाही. अतिशय कठोर उपोषण करणारआहे. हे आमचे शांततेचे युद्ध आहे. यात एक तर मराठा आरक्षणाची विजययात्रा निघेल; अथवा माझी अंत्ययात्रा. सरकारने अत्यंत गांभीर्याने घ्यावे. आता कोणत्याही परिस्थितीत वाटाघाटी करण्यासाठी कोणत्याही नेत्यांनी आपल्याकडे येऊ नये, अंतरवलीच्या वेशीवरूनच त्यांना परत जावे लागेल,’ असे त्यांनी सांगितले.सन २००१ च्या शासन आदेशात आता मिळालेल्या पुराव्यांच्या आधारावर सन २०२३चा नवीन शासनआदेश काढून त्यात संपूर्ण मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातील आरक्षण देऊनच शासन आदेश घेऊनच गावात यायचे,’ असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘आमचे गाव म्हणजे सगळे राज्य आमचेच आहे. गावात येणाऱ्या आमदार, खासदार आणि मंत्र्यांना गावबंदी असताना त्यांनी गावात शिरण्याचा प्रयत्न केल्यास चीनच्या सैनिकांना आपल्या भारतीय सैनिकांनी जसे कोपराने ढकलून बाहेर काढले. तसे यांना शांततेत आमचे मराठे गावाबाहेर काढतील; पण कुणीही हात उगारणार नाही.’

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *