दि. बेरार जनरल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय अकोला च्या एन. सी. सी. युनिटने राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्वातंत्र्य भारताचे दुसरे प्रधानमंत्री लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ०२ ऑक्टोबर, २०२२ रोजी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान मोहीम राबविली. ११ महाराष्ट्र बटालियन एन. सी. सी. अकोलाचे कमांडिंग ऑफिसर कर्नल बिजॉय चौधरी, लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला तसेच एल. आर. टि. कॉलेज ऑफ कॉमर्स अकोलाचे प्राचार्य डॉ. एस. जी. चापके यांच्या मार्गर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. श्रीमती. एल. आर. टी. कॉलेजचे प्रभारी प्राचार्य जी. जी. गोंडाणे व महाविद्यालयाचे एन. सी. सी. ऑफिसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांच्या उपस्थिती मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आय.क्यू.ए.सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल आणि डॉ. हरिष बडवाईक यांचे विशेष सहकार्य लाभले. सुरुवातीला महाविद्यालयाच्या स्टाफरूममध्ये महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. त्यानंतर एन. सी. सी. कॅडेट्सला मार्गदर्शन करतांना डॉ. जी. जी. गोंडाणे म्हणाले सत्य, अहिंसा, समानता व न्याय या तत्त्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे महात्मा गांधीजीची ओळख असून, आजचा हा दिवस जागतिक अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो. तसेच ‘जय जवान जय किसान’ या घोषणेने देशाच्या इतिहासात कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे स्वतंत्र भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादुर शास्त्री यांच्या विषयी सुद्धा त्यांनी माहिती दिली. श्रीमती एल. आर. टी. कॉलेजचे एन. सी. सी. विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सला स्वच्छतेचे महत्व समजावून देतांना लालबहादुर शास्त्री यांचे एक वाक्य विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वाटते आणि ते म्हणजे प्रत्येक कामाचे एक वेगळे महत्व असते. प्रत्येक काम आपण आपल्या पूर्ण क्षमतेनी केले की त्याचा आनंद वेगळाच मिळत असतो. तसेच महात्मा गांधी यांच्या ‘चले जाव’ या आंदोलनाचे महत्व एन.सी.सी. कॅडेट्सला स्वच्छतेच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सार्जंट जयश्री हरसुलकर हिने महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती निमित्त त्यांचे विचार कॅडेट समोर थोडक्यात मांडले. महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री या दोन्ही महामानवांच्या जयंती निमित्य महाविद्यालयातील संपूर्ण परिसर एन. सी. सी. कॅडेट्सनी स्वच्छ केला.
या कार्यक्रमाला दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्र जैन, मानद सचिव श्री. पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजित परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी कॅडेट्सला शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढविला. या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे, सार्जंट जयश्री हरसुलकर, सार्जंट ऋषिकेश पटेल, कॉर्पोरल शिवानी अवातिरक, कॉर्पोरल ओम डांगे, कॉर्पोरल प्राजक्ता नारखेडे, कॉर्पोरल वैष्णवी ढेंमरे, कॉर्पोरल कार्तिक लाडगे, कॉर्पोरल सागर वानखडे, कॅडेट शिवम देशमुख, कॅडेट रेशमा गालफाडे, कॅडेट वैष्णवी पांडे, कॅडेट साक्षी पांडे, कॅडेट तनाया नाफाडे, कॅडेट किरण माने, कॅडेट पुर्वा देवघरे, कॅडेट साक्षी गुप्ता, कॅडेट गीता गावंडे, कॅडेट साक्षी ठाकरे, कॅडेट सलोनी यादव, कॅडेट श्रीकांत वाडोकार, कॅडेट जय नांदोडे, कॅडेट सुरज सरकटे, कॅडेट नागेश कचरे, कॅडेट रितिक आगरकर, कॅडेट ॠषिकेश शेलार, कॅडेट प्रथमेश तळेकार, कॅडेट प्रणव वानखडे, कॅडेट वैभव कांबळे, कॅडेट रोशन इंगोले, कॅडेट कार्तिक लाडगे, कॅडेट सर्वेश धांडे आणि इतर कॅडेट्सनी बरीच मेहनत घेतली.