छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघणार पदयात्रा गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
गावोगाव सभेसाठी मूळवाटी देणार
मनोज जरांगे पाटील यांच्या सभेची प्रत्येक तालुका आणि गाव पातळीवर जनजागृती केली जात असून, सभेला येण्यासाठी घरोघर मूळवाटी दिली जाणार आहे. जनजागृती, बॅनर, प्रसिद्धी आदीबाबतच्या तयारीवर या पूर्वतयारी बैठकीत चर्चा करण्यात आली.
गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची सभा दि. 1 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर आयोजित करण्यात आली होती. मात्र, होणाऱ्या तुफान गर्दीचा विचार करता ही जागा अपुरी पडणार असल्याने आता 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता ही सभा नवीन मोंढा रोडवरील पांजरापोळच्या भव्य मैदानावर घेण्याचा निर्णय आज सोमवार दि. 20 नोव्हेंबर रोजी झालेल्या पूर्वतयारी बैठकीत घेण्यात आला.
आज दुपारी भाग्यनगरीतील मराठा महासंघ कार्यालयात सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चाची पूर्वतयारी बैठक झाली. 1 डिसेंबर रोजीच्या सभेला किमान 12 ते 13 लाख समाज बांधव उपस्थित राहणार असल्याने आझाद मैदान ही जागा अपुरी पडणार आहे तसेच पार्किंगसाठी आजूबाजूला जागा नसल्याने वाहतूक कोंडीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांची सभा 1 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता नवीन मोंढा रोडवरील पांजरापोळ्च्या भव्य मैदानावर घेण्याचा निर्णय झाला. दुपारी 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत सभास्थळापर्यंत पदयात्रा काढण्यात येणार आहे. उडपी चौक, सिंधी बाजार, सावरकर चौक, मामा चौक, बस स्टॅन्ड, भोकरदन नाका, ढवळेश्वर चौक ते सभास्थळ असा पदयात्रेचा मार्ग या बैठकीत निश्चित करण्यात आला.
समाज बांधवांनी मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी होऊन सभेला लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज आणि मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांची सभा नवीन मोंढ्यातील पांजरापोळ मैदानावर
Leave a comment