रायपूर येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर हजरत टिपू सुलतान यांची जयंती साजरी.

Khozmaster
1 Min Read

बुलढाणा सादिक शाह (रायपुर)। रायपुर येथे ग्रामपंचायत कार्यालयात मैसूर चा राजा हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन घडून आले यावेळी रायपूर येथील सामाजिक कार्यकर्ते  सीताराम पाटील लक्ष्मण काकडे रमेश गमलाडू शेख अकील उर्फ बादेश भुजंगराव लहाने जवांजाल साहेब माजी सैनिक अ खालिद शाहेझाद खान सुरेश हनवते आसिफ शेख यांच्या सर्वांच्या हस्ते म्हैसूरचा वाघ हजरत टिपू सुलतान यांच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला राहुल देशमाने  यांनी पुष्पहार अर्पण केला तर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला सुरेश हनवते यांच्या हस्ते हार अर्पण करण्यात आले व रायपूर येथील शहीद धर्मराज हनवते यांच्या स्मारक समोर सर्व ग्रामस्थांनी अभिवादन केले यावेळी सर्व गावकरी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली होती.

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *