सतिश मवाळ बारामती, देशातील सर्वात मोठी पत्रकार संघटना असलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या आढावा विशेषांकाची निर्मिती साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष तथा लेखक विनोद बोरे यांनी केली. या विशेषांकाचे प्रकाशन देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते बारामती येथे पार पडलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशनात करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीमध्ये माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे, देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांच्यासह सर्वस्वी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, कुमार सप्तर्षी, कुमार केतकर, संजय आवटे, धर्मेंद्र जोरे, जयश्री खांडीलकर होत्या. प्रकाशन समारंभावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे, साप्ताहिक विंगचे प्रदेशाध्यक्ष विनोद बोरेदेखिल उपस्थित होते. हा कार्यक्रम बारामतीमधील गदिमा सभागृहात पार पडला.
यावेळी शरद पवार, सुशिलकुमार शिंदे यांच्यासह सर्वच मान्यवरांनी व्हॉईस ऑफ मीडिया विशेषांकाचे अवलोकन केले. देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरे यांनी विनोद बोरे यांचे कौतूक केले. संजय आवटे यांच्याशी बोलताना ते म्हणाले की, विनोद बोरे हे धडपडे व्यक्तिमत्त्व असून, जेथे काम करतील तेथे आगळीवेगळी सकारात्मक छाप उमटवतील. व्हॉईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय संघटनेमध्ये त्यांनी केले काम ग्रेट आहे. व्हॉईस ऑफ मीडियाचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे हे नेहमीच त्यांच्या कार्याचे कौतूक करतात. विनोद बोरे यांची पत्रकारितेतील वाटचाल ही देशोन्नतीतून सुरू झाली. आज त्यांनी सकारात्मक पत्रकारिता अन् साहित्य क्षेत्रात चांगलीच उंची गाठली.
प्रकाशभाऊ पोहरे हेच माझे दैवत: विनोद बोरे
प्रकाशभाऊ पोहरे यांनी मला मुलाप्रमाणे जपले. सर्वोत्तम ज्ञान दिले. घडविले. आजरोजी लेखणीच्या माध्यमातून जे कार्य करीत आहे, ते केवळ प्रकाशभाऊ पोहरे यांच्यामुळेच शक्य झाले आहे. त्यांची धडपड, कार्यपद्धती ही नेहमीच डोळ्यासमोर असते.व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, व्हॉईस ऑफ मीडियाचे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के,अर्चना बोरे यांची खंबीर साथ अन् संदीप काळे यांच्या प्रेरणेमुळेच व्हॉईस ऑफ मीडियाचा आढावा विशेषांक निर्माण करू शकलो.