इसोली येथे निराधार अपंग महिलांना साडी वाटप करुन स्व.इंदिराजी गांधींना केले अभिवादन

Khozmaster
1 Min Read
.प्रतिनिधी :  चिखली तालुक्यातील इसोली येथे इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने विधवा परित्यक्त्या, निराधार अपंग महिलांना साडी वाटप करून इसोली कॉग्रेस व महा विकास आघाडी याच्या सयुक्त विधेमाणाने स्व. इंदिराजी गांधी याची जंयती साजरी केली.
भारत देशाच्या पहिल्या शक्तिशाली महिला पंतप्रधान स्व.इंदिराजींनी देश साक्षर होऊन समृद्ध व्हावा यासाठी अनेक कल्याणकारी योजना  गोरगरीब दीनदुबळ्या जनसामान्य माणसासाठी  राबवित,’गरिबी हटाव’चा नारा दिला,शेतकरी कष्टकरी तथा जनसामान्यांच्या साठी देशातील १४ व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण करित अनेक कणखर निर्णय घेतले,याचा आदर्श आजच्या पिढीने घेतला पाहिजे असे प्रतिपादन तालुका कॉग्रेस कमेटी चिखली चे अध्यक्ष समाधान सुपेकर यानी या वेळी केले
यावेळी ज्ञानेश्वर पचांगे समन्वयक,महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस, पंचायत समिती सदस्य सुरेंद्र खपके, दामोदर येवले, मोबिन भाई, कडु लाला जी, किशोर पाटील, शंकर रायकर, विकास शेळके, सुनील शुक्ला, डिगंबर शेळके, भिमराव गिरगुने, अशोक गवई, शाम सावत, शेषराव गवई, अमोल मोरे, शे इरफान, बाळु निकम, विजय गित्ते,नारायण कानोडे,शाम गित्ते, तुकाराम गायकवाड, शईद भाई, आब्बु भाई, उमर लाला, रशिद भाई  याच्या सह गावातील नागरिक उपस्थित होते

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *