रिचार्जची रक्कम भरभक्कम अन् नेटवर्कची बोंब ; मोबाईल वापरकर्त्य त्रस्त…!

Khozmaster
2 Min Read
 स्वप्निल देशमुख बुलढाणा ब्युरो रिपोर्ट 
वानखेड :-जीवनावश्यक वस्तू प्रमाणे मोबाईलचा वापर होत असला तरी त्याला लागणारे रिचार्जची ही रक्कम अवाच्या सव्वा असल्याचे बोलल्या जात आहे परंतू ग्रामीण भागात नेटवर्क मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत.
० ते ५ वयोगटातील बालकांना वगळून इतर सर्वच वयातील बर्‍यापैकी नागरिक मोबाईलचा वापर करत आहेत, जणूकाही एक प्रकारचे जड व्यसन लागले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. एखाद्या वेळेस देव दर्शन घ्यायला विसर पडेल परंतू मोबाईल हाताळल्या झोप लागणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.असे असले तरी नेटवर्कच्या नावाने बोल पडत आहे त्यामुळे ग्रामीण भागातला मोबाईल वापर वेळेवर रिचार्ज करणे आणि संबंधित कंपनीकडून रिचार्ज संपल्याच्या वारंवार सूचना सुद्धा दिल्या जातात त्यावर मोबाईल वापर करता हा स्वतःच ऍक्टिव्ह राहून आपल्या मोबाईलची काळजी घेतो आणि रिचार्ज करतो परंतु नेटवर्क मिळत नसल्याने गैरसोय होत आहे कारण काही विद्यार्थी सुद्धा याचा ऑनलाईन पद्धतीने अभ्यास करतात काहींना ऑफिशियली कामासाठी ग्रामीण भागात जावे लागतात त्यावेळेस त्याचं नेटवर्क काम करत नाही त्यामुळे त्या कामात सुद्धा अडथळा निर्माण होतो नेटवर्क मिळत नसल्याने अनेक अडचणीचा सामना करावा लागतो कोणाला काही पत्रिका पाठवायचे असतात किंवा काही शासनाकडून आलेली पीडीएफ ओपन करून बघायची असते त्यात काही महत्त्वाची माहिती सुद्धा दळलेली असते असे असताना या नेटवर्कच्यामुळे अनेक काम अडथळ्यात पडलेली आहेत त्यामुळे संबंधित नेटवर्क मोबाईल कंपनीच्या अधिकारींनी याकडे लक्ष देऊन होणाऱ्या त्रासापासून सुटका करावी अशी मागणी जोर धरत आहे.
—————————————————-
रिचार्जची रक्कम भरपूर असतानाही वेळेवर रिचार्ज मारतो परंतु नेटवर्क मिळत नसल्याकारणाने रिचार्ज चे पैसे व्यर्थ जातात संबंधित कंपन्यांनी याकडे लक्ष देऊन होणारा त्रास दूर करावा
दिलीप देऊकार वानखेड
 मोबाईल वापर करते
0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *