गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा
मंठा येथील नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर डॉ हाफेज शबाब बागवान यांना नुकताच राष्ट्रपिता महात्मा गांधी निसर्गोपचार गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधीजींचे स्वप्न नॅचरोपॅथी घराघरात पोहोचावी हे स्वप्न साकार करण्याचे कार्य उत्कृष्टपणे निसर्गोपचार आरोग्य क्षेत्रातील सेवा देणारे मराठवाड्यातील प्रॅक्टिशनरांचा राज्यस्तरी राष्ट्रपिता महात्मा गांधी निसर्गोपचार पुरस्कार देऊन गौरव करण्यात आले.
नॅचरोपॅथी प्रॅक्टिशनर डॉ. शबाब बागवान यांचे सामाजिक व निसर्गउपचार योगदान समाजात योग्य उपचार देणारे उपचार असून त्यांची कारकीर्द अत्यंत व्यापक स्वरुपाची आहे.व महत्वपूर्ण आहे, त्यांच्या यानैसर्गिक सेवाकार्याची दखल घेऊन त्यांना ‘महात्मा गांधी निसर्गोपचार गौरव हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण 18 नोव्हेंबर 2023 रोजी मौलाना आझाद संशोधन केंद्र औरंगाबाद येथील आयोजित सहावे राष्ट्रीय निसर्गोपचार दिवसा निमित्त सुर्या फाऊंडेशन, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन मराठवाडा, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आयुष्यमान मंत्रालय भारत सरकार, शिवसेना अल्पसंख्याक डॉक्टर सेल, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने निसर्गोपचार दिवसा निमित्त करण्यात आले.
याप्रसंगी व्यासपीठावर असलेले डॉ.पल्लवी,
मराठवाडा अध्यक्ष तथा आयोजक डॉ.शेख शकील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारोती म्हस्के, जिल्हा आयुष अधिकारी जालना डॉ.कुलदीप वाघपांजर, प्राचार्य शेख सलिम, डॉ.लक्ष्मन माने, डॉ.शेख अकबर, डॉ.मनोज लोनकर यांच्या हस्ते हा पुरस्कार सन्मान प्रदान करण्यात आला आहे.
डॉ. शबाब बागवान यांच्या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मंठा येथील नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच राजकीय नेते, पत्रकार, वकील ,शिक्षक, व डॉक्टर असोशियन तर्फे त्यांचे अभिनंदन केले आहे.