पालकमंत्र्यांच्या हस्ते स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा सत्कार

Khozmaster
2 Min Read

बुलडाणा, दि. 23 (जिमाका): जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांचा पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते आज जिल्हा नियोजन भवन येथे शाल, श्रीफल, प्रशस्तीपत्र आणि मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी खासदार प्रतापराव जाधव, सर्वश्री आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, संजय रायमुलकर, संजय गायकवाड आणि आमदार श्रीमती श्वेताताई महाले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते, पोलीस अधीक्षक सुनील कडासने व्यासपीठावर उपस्थित होते.

 स्वातंत्र्यसैनिकांच्या वारसांमध्ये अनुसयाबाई संभाजी गवई, सुशिला भास्करराव देशमुख, मंगलाबाई माणकचंद बनवट, यशोदाबाई विठ्ठलराव इंगळे, सुशीलाबाई विश्वनाथ अंजनकर, शोभा प्रभाकरराव चतून, सुमनबाई पांडूरंग पाटील, बिसमिल्लाबी मोहम्मद हनीफ आणि सुनंदाबाई राजाराम पाठक यांचा समावेश होता.

 *****

‘महा-रेशीम अभियान २०२४’ जनजागृतीस प्रारंभ

 

  • आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दाखवली हिरवी झेंडी

       बुलडाणा, दि.२३ (जिमाका) : ‘महा-रेशीम अभियान २०२४’ चा आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून आज जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रारंभ करण्यात आला. महा-रेशीम अभियानाचा चित्ररथ जिल्ह्यातील रेशीम शेतीसाठी इच्छूक असणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करणार आहे.

महा-रेशीम अभियानाचा हा प्रसिद्धी चित्ररथ जिल्ह्यातील ग्रामीण भागात फिरून २० नोव्हेंबर ते २० डिसेंबर २०२३ दरम्यान जनजागृती करणार आहे. जिल्हा रेशीम विकास अधिकारी व्ही. बी. ठाकरे, वरिष्ठ क्षेत्र सहायक नरेंद्रम भुरे, आशिष जोशी, बी. एल कुमावत, रेशीमचे सेवानिवृत्त सहायक संचालक राजाराम जोगदंड, प्राचार्य मुकुल पारवे, गळवे रेशीम चॉकी सेंटरचे जगदीश गुळवे उपस्थित होते.

जिल्ह्यातील ओलिताखालील सर्व शेतकरी ५०० रुपये नोंदणी शुल्क भरून रेशीम रोपे तयार करण्याचे प्रशिक्षण महिन्याभरात देण्यात येणार आहे. जिल्ह्यात कृषि, जिल्हा पिरषदेचे पंचायत आणि जिल्हा परिषदेच्या कृषि विभागाकडून संयुक्तपणे ही योजना राबविण्यात येणार असून, जिल्ह्याला ६०० लाभार्थ्यांचे लक्ष्य देण्यात आले आहे.          00000

0 9 4 8 2 6
Users Today : 66
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *