गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मा. मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकारी परतुर यांच्या मार्फत निवेदन देऊन दिनांक. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी तक्रार करण्यात आली, निवेदनात पुढे म्हटले आहे की, मूळ ऑर्डर वर्धा जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी हिंगणघाट येथे असतानी परतूर येथे कार्यरत कसे झाले, कारण जालना जिल्ह्यातील तालुका परतुर येथे कार्यरत असलेले उपविभागीय कृषी अधिकारी श्री रोडगे यांनी लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे, कारण श्री रोडगे हे तालुका कृषी अधिकारी घनसावंगी येथे कार्यरत होते, त्या नंतर उपविभागीय कृषी अधिकारी परतुर श्री. सोनकांबळे यांना १ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडून कारवाई करण्यात आली होती, त्या नंतर उपविभागीय कृषी अधिकारी परतुर येथील बऱ्याच दिवसांसाठी जबाबदारी श्री रोडगे यांना देण्यात आली होती,तसेच याच कार्यकाळात तालुका कृषी अधिकारी घनसावंगी या पदावर असताना लाखो रुपयाचा घोटाळा श्री रोडगे यांनी केलेला आहे, परतूर येथे उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर तात्पुरते काम करीत असताना त्यांची पदोन्नती झाली प्रमोशन झाल्यानंतर त्यांना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्धा जिल्ह्यातून दोन-तीन महिन्यात बदली कशी झाली, कारण जालना जिल्ह्यातील कृषी विभागात कसा भ्रष्टाचार करता येतो याचा दांडगा अनुभव रोडगे यांना असल्यामुळे कोट्यावधी रुपयाची संपत्ती कमावण्यासाठी रोडगे यांची मूळ ऑर्डर हिंगणघाट येथे आहे, परंतु त्यांनी ३० लाखापेक्षा अधिक खर्च करून परतुर उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून त्यांनी खासबाब म्हणून जबाबदारी दिली ती ऑर्डर रद्द करून कारण मूळ ऑर्डर हिंगणघाट येथील असतानी मग परतूर येथे कसे कार्यरत आहेत, हा खूप गंभीर विषय आहे, कारण उपविभागीय कृषी अधिकारी परतुर या पदावर राहुन कोट्यावधी रुपये कमावता येतात
म्हणून श्री रोडगे यांनी परतुर येथे पूर्ण ताकद लावून उपविभागीय कृषी अधिकारी परतुर या पदावर विराजमान झाले, म्हणून श्री रोडगे यांना बडतर्फ करून त्यांची चौकशी करण्यात यावी हि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अपेक्षा आहे. कारण मूळ ऑर्डर वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागीय कृषी अधिकारी म्हणून ऑर्डर असतानी, जालना जिल्ह्यातील परतुर उपविभागीय कृषी अधिकारी या पदावर श्री रोडगे यांनी भ्रष्टाचार करून पैसे कमावण्यासाठी परतुर येथे कार्यरत आहेत कारण श्री रोडगे यांनी या भागात कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार केला असून त्यांना बडतर्फ करून जालना जिल्ह्यातील उपविभागीय कृषी अधिकारी परतुर या पदावरून तत्काळ कमी करून पुढील कारवाई करण्यात यावी आशी निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
Ramesh Chavhan