गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
मंठा शहरात मुस्लिम समाजाचा दोन दिवसीय तब्लीगी उमुमी इज्तेमा आज पासून सुरू झाले आहे . दि. 22व 23 नोव्हेंबर रोजी सरकारी पशुवैद्यकीय परिसराच्या पाठीमागे मुख्य मैदानवर मागील पंधरा दिवसापासून जैएद तयारी करून इस्तेमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित राहणार आहे.
यासाठी जालजा शहर ,नेर-शिवली ,राजणी वाटुरफाटा मंठा तालुका सहित जालना जिल्ह्यातून पंधरा ते वीस हजार मुस्लिम बांधव या तब्लीगी उमुमी ईज्तेमामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
याठिकाणी भव्य पिंडाल उभारण्यात आला असुन पाण्याच्या सुविधेसाठी तीन सबिल( स्टॉल) ठेवण्यात आले आणि स्नानगृह आणि शौचालये बांधण्यात आली ईज्तेमा येथे येणाऱ्या हजारो वाहनासाठी भव्य वाहनतळ करण्यात आले आहेत तर येणाऱ्या लोकांसाठी भोजनाची उत्तम व्यवस्था तसेच वैधकीय शिबिराचे आयोजन, औषधी बरोबरच अतिदक्षता विभाग,ऑक्सीजन आणि अग्निशमन दलाची ही व्यवस्था करण्यात आली आहेत. येथील सर्व मुस्लिम समाजातील लोक सक्रियपणे सतत काम करत आहेत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनीचे चोख बंदोबस्त ठेवला आहे.
या दोन दिवसीय ईज्तेमा कार्यक्रमात पुणे व मुंबई येथील आदरणीय मौलाना व मुस्लिम प्रबोधनकार यांच्या प्रवचन समाजात होणाऱ्या अंधारमय अज्ञानातून बाहेर काढण्या विषय वाणी होणार आहेत तरी सर्व मुस्लिम बांधवांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहेत. शेवटी 23 नोव्हेंबर गुरुवार रोजी मगरिबची नमाजनंतर रात्री ८ वाजता दुआ ( प्राथना ) करून ईज्तेमाची सांगता होईल.