निगंनुर येथे टिपू सुलतान जयंती मोठ्या उत्साहात साजरी

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी मैनोदिन सौदागर  निगंनुर.
 तलवारीच्या टोकावर इंग्रजी सत्तेला सळो की पळो करून सोडणारे जुलुमी राजवटीचा सातत्याने सामना करणारे म्हैसूरचे राजे टिपु सुलतान यांची जयंती दि. २० नोव्हेंबरला निंगनुर येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. टिपू सुलतान यांचा जन्म कर्नाटकातील देवनाहल्ली येथे २० नोव्हेंबर १७५० साली झाला, त्यांचे पुर्ण नाव सुलतान फतेह अली खान शाहाब असे आहे. जुलुमी इंग्रजी राजवटीला कर्नाटकात सळो की पळो करून सोडणाऱ्या टिपू सुलतान यांच्या पराक्रमाचा इतिहास कधीच पुसला जाऊ शकणार नाही असे विचार यावेळी व्यक्त करण्यात आले.आहे  निंगनुर ग्राम पंचायत कार्यालयात  टिपू सुलतान जयंती उत्साहात संपन्न झाली  या  जयंती कार्यक्रमात सरपंच सुरेश बरडे माजी पोलीस पाटील उत्तम मुडे. फारुख खाँन.पि.सि.भोळे. मैनोदिन सौदागर.शिवाजी कवडे. बाबरखाँन.मुतालिबखाँन अझरोदिन सौदागर. असिफखाँन.समिर नवाब.ईरफान नवाब.सोहेल खाँन.कैफ खाँन.बिलाल शाहा.रिहान खतिब.फिरोज नवाब.सोहेबखाँन.ओसामोदिन सौदागर.व ग्रा. पं. कर्मचारी  पांडुरंग महाले गजानन पुरी उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *