गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा( हजारो मुस्लिम अनुयनांनी हात पसरूवून जगात शांतता नांदण्याची केली दुवा…!! )
मंठा शहरात आयोजित दोन दिवसीय तब्लिगी – उमुमी इज्तेमाची ता.23 नोव्हेंबर रोजी रात्री सांगता झाली.
पार पडलेल्या इज्तेमाचे आयोजन मुस्लिम बांधवांच्या वतीने करण्यात आले होते. या इज्तेमा मध्ये – नेर ,सेवली ,रांजणी, रामनगर जालना शहरासहीत मंठा तालुक्यातील जवळपास 20 ते 25 हजार लोकांनी शिरकत (सहभागी) – केली होती.
मंठा शहरातअसलेल्या – पशुवैद्यकीय तालुका रुग्णालयाच्या पाठीमागे – असलेल्या प्रांगणात या भव्य कार्यक्रमाचे आयोजन (ता.22) रोजी पासून
औरण्यात आले होते. या वेळी हजारो मुस्लिम बांधवांनी साश्रू अनुयनांनी अल्लाह समोर हात पसरूवून जगात शांतता नांदण्याची याचना – (दुवा) केली.
मंठा शहरात कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी सलग 6 सहा जोडप्यांचे लग्नकार्य करण्यात आले 15 दिवसापासून मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने तयारी सुरू होती. बाहेर गावावरून आलेल्या सर्व समाज बांधवांची व्यवस्था अत्यंत चोख पद्धतीने व्हावी यासाठी सर्व समाज बांधव अथक परिश्रम घेत होते.
स्वयंसेवकांची मोठी जबाबदारी होती. त्यांनी ती जबाबदारी अचूक पणे पार पडत असताना येणाऱ्या सर्व लोकांना मार्ग दाखवणे, पार्किंगची व्यवस्था करणे, बुधवारी सकाळच्या नमाजाने सुरू झालेल्या या इज्तेमाची सांगता मगरीच्या नामाचा नंतर रात्री आठ वाजता दुआ ने झाली. देश व दुनियेत अमन शांती साठी दुआ करण्यात आली.
यासंमेलनात मालेगाव नंदुरबार धुलिया ,येथील हजरत मुफ्ती हुजेफा साहेब ,हाजी हबीब साहेब, हजरत मौलाना अब्दुल अलीम साहेब या मौलानांनी प्रवचनात म्हणले मुस्लिम बांधवांनी सदैव अल्लाहचा ‘जिक्र’ करीत राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ‘कुरआन’ची तिलावत व शिक्षणामुळे जगातील चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती होते. प्रेषितांनी ‘दीन’ आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. समाजाला चांगली दिशा दाखविण्यासाठी कुणीही अल्लाहचा दूत येणार नसल्याने प्रेषितांनी दाखविलेल्या ‘नेकी’च्या मार्गावरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे मार्गदर्शन (बयान) केले.
यानिमित्ताने तब्बल ,15 ते 20 हजार लोकांनां राहण्याची, जेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. पोलिस निरीक्षक खेडकर यांच्या नेतृत्वात त्यांचे सहकारी पोलीस अधिकारी, कर्मचारी यावेळी तैनात होते. मगरिब ची नमाजनंतर रात्री ८ ते 9 वाजेच्या ,दरम्यान आल्लाह समोर हात पसरून दुआ ( प्राथना ) करून कार्यक्रमाची सांगता झाली.
याठिकाणी माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया , आमदार रोहित पवार व रोहिते आर पाटील यांनी धावती भेट देऊन शुभेच्छा दिल्या तसेच मंठा तालुक्यातील जिल्हाप्रमुख ए जे पाटील बोराडे , गोपालराव बोराडे , तालुकाप्रमुख उदयदादा बोराडे, परतुर चे कपिल भैय्या आकात व ,विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार आदींनी कार्यक्रमस्थळी भेटी देऊन समाज बांधवांना शुभेच्छा दिल्या विविध समाजातील लोकांनी येथे भेट ही दिल्या. सलग दोन दिवस सुरू असलेला हा कार्यक्रम व्यवस्थितरित्या शांततेत पार पडला.