राष्ट्रीय पातळीवरील बेसबॉल खेळाडू चेन स्नॅचर कसा बनला, कारण समोर येताच साऱ्यांना आश्चर्याचा धक्का

Khozmaster
2 Min Read

मुंबई: गोरेगाव येथील राष्ट्रीय पातळीवर बेसबॉल खेळलेल्या खेळाडूला सोनसाखळी चोरण्याच्या गुन्ह्यात पकडण्यात आले आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेअर मार्केटिंगमध्ये गमावलेले पैसे कमावण्यासाठी केलेल्या गुन्ह्यामुळे एका तरुणाला तुरूंगात जायची वेळ आली आहे.गोरेगावच्या मोतीलालनगरमध्ये राहणाऱ्या प्रेसी डिसुझा (६०) या रविवारी बाजारातून घेऊन घरी परतत होत्या. पायी चालत असताना व्हिबग्योर स्कूलजवळ पाठीमागून आलेल्या एका तरूणाने त्यांना धक्का दिला. प्रेसी यांना काही कळण्याआधीच त्या तरूणाने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी खेचून पळ काढला. या घटनेनंतर प्रेसी यांनी बांगुरनगर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केली.

बांगुरनगर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. वरिष्ठ निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक संजय सरोळकर, उपनिरीक्षक टरे यांच्यासह देसाई, भोसले, चव्हाण, दळवी यांच्या तपास सुरू केला. घटनास्थळी जाऊन चोर पळून गेल्याचा मार्ग तसेच इतर लहानसहान बाबींची पोलिसांनी बारकाईने तपासणी केली. सीसीटीव्ही फूटेज आणि तपास कौशल्य वापरून सोनसाखळी चोरणाऱ्याची ओळख पटवली. या चोराचे नाव आकाश धुमाळ असून तो गोरेगावच्या भगतसिंग तो राहत असल्याचे समजले. पोलिसांच्या पथकाने आकाश याला शोधून अटक केली.कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या आकाश याने हा गुन्हा का केला, याबाबत चौकशी पोलिसांनी केली. त्यावेळी आकाशने शेअर मार्केट गुंतवणुकीत गमावलेले १६ लाख परत करण्यासाठी हे कृत्य केल्याचे समजले. आकाश काही वर्षांपूर्वी बेसबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर खेळला होता. या क्षेत्रात अधिक संधी न मिळाल्याने तो शेअर मार्केटिंगमध्ये काम करू लागला. त्यासाठी कर्ज काढून घेतलेले पैसे बुडाले.

कर्जदारांचे पाच लाख त्याने फेडले मात्र उर्वरीत पैशासाठी कर्जदारांचा तगादा सुरू होता. आकाश सध्या एका खासगी कंपनीत लेखा विभागात नोकरीला आहे. मात्र पगारातून इतकी रक्कम झटपट मिळवणे शक्य नसल्याने त्याने सोनसाखळी चोरीचा गुन्हा केला.

0 9 3 7 3 5
Users Today : 16
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *