कोल्हापूर: डुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या विजेच्या तारांना स्पर्श होऊन दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जोतीराम सदाशिव कुंभार (वय 64) आणि नायकू सदाशिव कुंभार (वय 60 दोघेही रा. राक्षी, तालुका पन्हाळा ) असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. दोघेही खेकडे पकडण्यासाठी गेले असता यावेळी त्यांचा विजेच्या तारांचा स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दि. ८ रोजी रात्री घडली असून चोरट्या शिकाऱ्यांचे भिंग फुटू नये म्हणून शिकाऱ्यांनी हे मृतदेह जंगलात फेकून दिले होते. तब्बल ५ दिवसानंतर मृतदेह जंगलात मिळून आले आहेत. या प्रकरणी ६ शिकारी चोरांना ताब्यात घेण्यात आले आहे.
दरम्यान अधिक चौकशी केली असता दोन्ही कुंभार भावांचा तारेला स्पर्श होऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. तसेच आपले बिंग फूटू नये म्हणून शिकारी चोरांनी दोन्ही मृतदेह पावनगडावरून जंगलात टाकून दिले. दरम्यान, आज चार दिवसानंतर या दोन्ही मृतदेहांना जंगलातून बाहेर काढण्यात आले. याप्रकरणी सहा संशयतांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेने पन्हाळा परिसरात खळबळ उडाली असून राक्षी येथील ग्रामस्थांनी पन्हाळा पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली आहे.
Users Today : 15