जालना : भाजपचे विधान परिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला आरक्षण दिलं याचा अभिमान आहे. आमचे एकच साहेब आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब, असं पडळकर म्हणाले. काही पुरोगामी नेते समजणारे अनेक जातीयवादी आरक्षण मागत आहेत पण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत नाहीत, असं पडळकर यांनी म्हटलं होतं. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक संजय लाखे पाटील यांनी गोपीचंद पडळकर यांना प्रत्युत्तर दिलं आहे. फडणवीसांच्या सुपाऱ्या घेणं पडळकरांनी बंद करावं, २०१४ च्या पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगर आरक्षण देऊ म्हणून अद्याप न देणाऱ्या फडणवीस यांची गुलामगिरी बंद करावी, असं संजय लाखे पाटील म्हणाले.मराठा क्रांती मोर्चानं गोपीचंद पडळकरांना इशारा दिला आहे. मराठा आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांनी उठाठेव करू नये, अन्यथा जशाच तसं उत्तर देऊ, असं संजय लाखे पाटील म्हणाले.
काही पुरोगामी नेते समजणारे अनेक जातीयवादी आरक्षण मागत आहेत पण ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेत नाहीत, असं पडळकर यांनी म्हटलं होतं. पडळकरांच्या या टीकेला उत्तर देत पडळकरांनी आधी धनगर बांधवांची फसवणूक करणं सोडून दिलं पाहिजे, कारण पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं होतं.आज शेकडो कॅबिनेट झाल्या आहेत, पण निर्णय झालेला नाही, असं लाखे पाटील म्हणाले.