सतिश मवाळ
मेहकर प्रति. पंढरपूर म्हणून समजले जाणारे देऊळगाव माळी तालुका मेहकर येथे कार्तिक महोत्सवानिमित्त 26 / 11 चा सातवा दिवस तसेच 26/ 11 च्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून भव्य असा डोळ्याचे पारणे फेडणारा दिप महोत्सव श्री.पांडुरंग संस्थान येथे समस्त गावकऱ्यांच्या वतीने पार पडला. यावेळी गावातील माता-भगिनी यांनी पिवळे वस्त्र धारण करून प्रत्येक महिलेने अकरा दिवे आपल्या सोबत आणून विठ्ठल मंदिराचा परिसर उजळून टाकला होता. कुठल्याही प्रकारचा लाईटचा प्रकाश परिसरामध्ये नव्हता फक्त आणि फक्त दिव्यांच्या लख्ख प्रकाशात मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. व प्रत्येक घरामध्ये अकरा दिवे लावून हार्दिक महोत्सव साजरा करण्यात आला. हा दीप महोत्सव साजरा होता ना जणू काही आपण नभांगणात आलो की काय?असा थोड्यावेळ भास होत होता. कार्तिक महोत्सवाचा भागवत सप्ताहाचा 26/11 चा हा सातवा दिवस होता. आणि 27/11 ला या महोत्सवाची काल्याचे किर्तन, व महाप्रसादाने सांगता होणार आहे. महाप्रसादासाठी गावातील तसेच परिसरातील व संस्थांनचे समस्त पदाधिकारी कार्यकर्ते मेहनत घेऊन हे कार्य तडीस नेतात. आषाढी आणि कार्तिकीला पंढरपूर येथे जसा सोहळा पार पडतो तसाच सोहळा प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या देऊळगाव माळी येथे पार पाडला जातो. तसेच वर्षभर विविध उपक्रम सुद्धा पांडुरंग संस्थान व गावकऱ्यांच्या सहकार्याने पार पडत असतात.