गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी
सोशल मीडियाचा वापर करतांना दोन समाजात तेड निर्माण होईल, धार्मिक व जातीय भावना दुखावल्या जातील अशा पोस्ट, फेसबुक,वाटसप,व ईतर व्हिडिओ सोशल मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या पोस्ट व्हायरल करू नये. सोशल मीडियाचा वापर करतांना जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची सर्वांनी काळजी
घ्यावी, असे आवाहन मंठा पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांनी केली आहे.
मंठा तालुक्यातील सर्व समाजातील नागरीकांनी आपल्या तालुक्यातील सामाजीक सलोखा व शांतता टिकुन ठेवण्यासाठी नागरीकांनी सोशल मिडीयाचे माध्यमातुन (फेसबुक, व्हाट्सअप, ईन्स्टाग्राम ईतर माध्यमातून समाजा विषयी अथवा नेत्यांविषयी अक्षेपार्ह मजकुराचे अथवा चित्र असलेले मेसेज फोटो, व्हिडीओ ईत्यादी प्रसारीत करु नयेत, अक्षेपार्ह मजकुर/फोटो, व्हिडीओ प्रसारीत केल्याची माहिती मिळाल्यास संबंधिता विरुद्ध प्रचलीत कायद्यान्वये गुन्हे नोंद करुन कार्यवाही करण्यात येईल, सर्व नागरीकांनी शांतता व सुव्यवस्था टिकवुन ठेवण्यासाठी सहकार्य करावे. असे आवाहन प्रसिद्धी पत्रकाद्वारे पोलीस निरीक्षक मारूती खेडकर यांनी केले आहे.