वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून वाशिम जिल्ह्यातील काही मंडळे दुष्काळसदृश यादीतून वगळली आहेत. जिल्ह्यातील सर्व 46 मंडळे दुष्काळग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात आज जिल्हाधिकारी मा.भुवनेश्वरी एस व जिल्हाअधिक्षक कृषी आधिकारी यांना भेटून चर्चा करून निवेदन देण्यात आले. विशेष म्हणजे भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी मा. भुवनेश्वरी एस व जिल्हाअधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी अतिशय अक्रमक भुमिका घेऊन खरीपातील पीकविमा भरणार्या जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांना पीकविमा अग्रीम 25% मंजुर करून घेतल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सविस्तर चर्चा करून वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करून वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरसकट मदत द्यावी आशी मागणी यावेळी भूमिपुत्र कडुन करण्यात आली. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी सकारात्मक चर्चा करून भुमीपुत्रच्या निवेदनाची तात्काळ दखल घेऊन शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. यावेळी राज्य उपाध्यक्ष डॉ. विश्वनाथ शेवाळे, प्रदेश उपाध्यक्ष अरुण सुरोसे, युवक राज्य उपाध्यक्ष, जिल्हाअध्यक्ष रामेश्वर आवचार, जिल्हाकार्याध्यक्ष उत्तम आरू, युवक प्रदेश उपाध्यक्ष केशव गरकळ, महिला समन्वयक डॉ. तृप्ती गवळी, महिला जिल्हा कार्याध्यक्ष उषाताई नाईक यांच्यासह युवक जिल्हा अध्यक्ष सचिन काकडे, परभणी जिल्हाध्यक्ष राजेश भालेराव, वाशिम तालुका अध्यक्ष संतोष सुर्वे, कारंजा तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील लांडकर, रिसोड तालुका अध्यक्ष श्रीरंग नागरे, मालेगाव तालुकाका अध्यक्ष विनोद घुगे, मंगरूळपीरचेे तालुकाध्यक्ष गुणवंत ठाकरे, मानोऱ्याचे भूषण मुराळे, रिसोड चे विकास झुंगरे , संजय सदर, जालिंदर देवकर, गजानन काकडे, साहित्यीक विषणु जोशी, गजानन भुतेकर, सचिन खोपडे, ज्ञानेश्वर सोमटकर, गजानन जाधव, विकास आवले, दत्तात्रय खरात यांच्यासह भूमिपुत्र शेतकरी संघटनेचे वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.