सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत.
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि.२७/११/२३रोजी शालि उस्ताद बाबा व कार्तिक पौर्णिमा निमित्ताने कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे.महाराष्टभर मानाची स्पर्धा अशी ओळख असलेली कुस्ती स्पर्धा म्हणजेच स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या आयोजनाचा मान सध्या सावळदबारा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला मिळाला आहे.तरी जास्तीच जास्त कुस्तीपटू यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन उपसरपंच मो आरिफ मो लुखमान यांनी केले आहे.२७ नोव्हेंबर दरम्यान रोजी पार पडणार आहे. या स्पर्धेत जवळपास बरेच कुस्तीपटू सहभागी होणार आहेत प्रसारक मंडळ आणि सावळदबारा यांच्यावतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती आयोजकाच्या वतीने उपसरपंच मो आरिफ मो लुखमान यांनी दिली आहे.
यंदाची कुस्ती स्पर्धा दरवर्षी प्रमाणे स्पर्धा सावळदबारा येथे पार पडणार आहे.कुस्ती मधे पंचांच्या निर्णय अंतिम राहील.संघ यांच्या वतीनं या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उपसरपंच मो आरिफ मो लुखमान यांनी दिली आहे
आज सोमवारी दुपारी एक वाजता कुस्त्याच्या मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कुस्त्याच्या मैदाना साठी महाराष्ट्रातून पुणे, नगर, जालना परभणी, जळगाव, बुलढाणा, चाळीसगाव, औरंगाबाद या राज्यातील विविध जिल्ह्यातून नामवंत मल्ल उपस्थित राहणार आहे. कुस्ती खेळताना स्वाताची जवाबदारी स्वातावर राहील पंचकमेटी जबाबदार राहणार नाही. तरी ग्रामस्थांनी व नामावंत मल्लांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशे आवाहन ग्रामस्थ व पंचकमेटीच्या वतीने मो. आरिफ मो. लुखमान उपसरपंच सावळदबारा यांनी केले आहे. येथे होणाऱ्या या कुस्त्या शिवाजी विद्यालयच्या मैदानावर होणार असल्याची माहिती पण मो. आरिफ मो. लुखमान यांनी सांगितले आहे तरी याचा लाभ
मल्ल पहेलवानानी व पंच कोषीतील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी शुद्धा केले आहे. या जंगी कुस्तीला फर्दापूर पोलीस स्टेशन पोलिस सहायक पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्या मार्गदर्शना खाली चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. अशे मो. आरिफ मो. लुखमान उपसरपंच सावळदबारा यांनी दिली आहे.