छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत सोयगाव.
सोयगाव तालुक्यात व सावळदबारा परिसरासह ठिकठिकाणची मंजूर पाणंद रस्ते करण्याच्या घोषणेनंतर शेतकरी व नागरिक ये जासाठी धड रस्ता मिळेल यामुळे खुश होते. परंतु त्यावर विरजन पडले व ती केवळ कागदी घोषणा ठरली लाभार्थी उपेक्षित राहुनही ते त्या रस्ता कामाची अपेक्षा करत असल्याचे चित्र आहे. वर्ष २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात गावोगावी पाणंद रस्त्यांच्या कामाची घोषणा झाली ते रस्ता काम पंचायत समिती स्तर ग्रामपंचायत अंतर्गत कामे हाती घेणार होते तर ठिक ठिकाणी ग्रामसभेतून त्याचे वाचण ही झाले तद्नंतर त्याची जायमोक्यावर पाहणी ही झाली. मात्र काही शेजारी पाजारी शेतकऱ्यांची तक्रारी अडथळे अडचणी निर्माण झाल्या प्रकरण तहसीलदार पर्यंतही गेले त्यांनीही पाहणी करून रस्ता करण्याचा विश्वास दिला. परंतु रस्ते आनंत अडचणी नंतर जैसे थे पडून आहे. शेतकऱ्यांना व नागरिकांना रस्त्याची गरज असल्याने त्यांनी त्यांच्या स्तरावर वर्गणी करुन पुरता पुरती रस्ते करून ये जा सुरु ठेवली परंतु महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत पाणंद रस्ते न केल्याने शेतकरी नागरिकात शासन प्रशासन विरोधात नारजी आहे. गाजावाजा ग्रामसभेत कागदोपत्री दैनिकात, प्रत्यक्ष मात्र पाणंद रस्ते घोषणा व कागदावरच असल्याने नागरिकांचा विशेष करुन पावसाळ्यात व तदनंतर दैनंदिन त्रास जैसे थे असल्याचे चित्र असुण वरिष्ठ कार्यालय तथा अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून नियोजित कामे न होण्याचे कारण तथा हलगर्जीपणा कामात टाळाटाळ बद्दल कारवाई करुन तातडीने पाणंद रस्ते करण्यात यावे करावे.अशी मागणी सोयगाव पंचायत समितीचे माजी सभापती धरमसिंग चव्हाण यांनी केली आहे.