13 वर्षापासून महिलेची वन विभागाकडून फसवणूक..!
कोल्हापूर जिल्ह्यात 1200 कोटी रुपयांचे गौण खनिज गायब
पुणे कार्यालय- प्रतिनिधी, महिला सबळीकरण, सक्षमीकरण महिलांना आरक्षण अशा पोकळ घोषणाचा भडीमार शासनाकडून केला जातो. इतकंच नव्हे तर अशा प्रकारच्या जाहिरातींवर शेकडो कोटी रुपयांचा निधी खर्च केला जातो. प्रत्यक्षात मात्र चित्र काही वेगळेच आहे. राज्यासह देशभरात महिलांची होत असलेली पिळवणूक ती म्हणजे शारीरिक, मानसिक, आर्थिक या स्वरूपाची आहे . क्षेत्र कुठलेही असो राजकीय व्यावसायिक शैक्षणिक सामाजिक महिलांची प्रगती काही अहंकारी पुरुषांना खलतेच. आणि मग या मधूनच सुरू होतात त्या महिलेवर अत्याचार… पुरुषी अहंकाराने त्रस्त ही महिला कधी निर्भया कधी कोपर्डी कधी मी टू तर कधी कोल्हापूरची ‘पुजा’ ठरते. ज्यावेळी अन्याय- अत्याचाराची सीमा ओलांडून मानसिक दडपणाच्या आहारी जाऊन आत्महत्या करतात अशावेळी जन सामान्यांना, प्रशासन खडबडून जाग येतो. पुढे सुरू होतो तिच्या न्यायाचा लढा . जिवंत असताना त्या महिलेला कोणीही कोणत्याही प्रकारचा साथ देत नाही. परंतु मृत पावल्यानंतर तिच्या लढ्याचे श्रेय लाटण्यासाठी कुठे कॅण्डल मार्च तर कुठे काय कोणती शक्कल लढवून करणार हे आजपर्यंत आपण सर्वांनी बघितल आहे. पिढ्यानु पिढ्यात चालत आलेली ही परंपरा कधीकाळी खंडित होणार का..? हा प्रश्न सर्वांनाच पडतो. परंतु पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशात महिलांचे शोषण म्हणजे एक फॅशन बनली आहे हे त्रिकालबाधित सत्य आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शिव गावातील पूजा चौगुले (माइन ) या महिलेने स्वावलंबी बनायचे ठरवले. याच अनुषंगाने परिसरातील होतकरू कष्टकरी महिलांना सोबत घेत नोंदणी केली. संस्था नोंदणी नंतर आर्थिक सक्षमीकरणासाठी महिलांना रोजगार उपलब्ध करून द्यावा लागतो हाच उदात्त हेतू मनाशी बाळगून गौण खनिज उत्खनन म्हणजेच मायनिंगच्या खडतर आणि आव्हानात्मक व्यवसायात या महिलांनी काम करण्याच धाडस केलं. अर्थातच अशा जीव घेण्या व्यवसायात देशभरात तुरळक महिला असतील यात तिळमात्र शंका नाही. 2010 च्या वर्षारंभी पंचतारा महिला खान मजूर व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित टोप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर र. न. के. पी. आर./ एच. एल. ई / आर. पी. डी /आय /4060 स्थापना 5/5/2010 या संस्थेच्या वतीने गौण खनिज उत्खनन परवानगीसाठी वनविभाग कोल्हापूर यांच्याकडे रीतसर दस्तावेज दाखल केले. पाच वर्षाच्या प्रदीर्घकालावधीनंतर प्रशासकीय नियमांची पूर्तता करीत अखेर 12.5 एकर जमिनीमधून गौणखनीज उत्खननाची परवानगी मिळाली.
राज्यात प्रथमच महिला मायनिंग चे काम करणार आणि साडेबारा एकर वनपरिक्षेत्राच्या हद्दी मधून शासकीय परवानगिने गौण खनिजाचा व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणार अशा प्रकारची सोनेरी स्वप्न रंगलेली असताना प्रत्यक्षात मात्र विपरीत घडले. महाराष्ट्र शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी संबंधित संस्थेच्या महिला पदाधिकारी प्रत्यक्ष स्थळी गेल्या असता 17 गुंठे हद्दीमधील जमिनीतून मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन झाले होते. त्याचप्रमाणे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या जागेची हद्द आखणी करत असताना याच हद्दीमध्ये इतर 18 गुंठे अवैध उत्खनन म्हणजे एकूण 35 गुंठ्यामधील गौण खनिज उत्खनन करून अवैध वाहतूक तसेच विक्री करण्यात आली होती. हा सगळा प्रकार पूजा चौगुले यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. वन विभागाच्या वतीने रीतसर पंचनामा करण्यात आला. कायदेशीर कार्याची पूर्तता करण्यात आली मात्र गेलेले गौणखनिज म्हणजे हिंदीतील ओळीप्रमाणे झालं ‘गाव बसा नही लुटेरे पहिले से आ गये ‘…
खरंतर इथूनच सुरू झाली वनविभागाकडून महिलेची, दमछाक छळ, पिळवणूक केंद्रशासन्माण्य प्रकल्प असल्यामुळे लाचार असलेला वनविभाग सावजाप्रमाणे महिलेची चौफेर बाजूने नाकाबंदी करू लागला. माईनमाफिया आणि वन अधिकारी यांचे चर्चासत्र बैठका रंगू लागल्या आणि घडले तेच…..
अनपेक्षित.
आजतागायत या महिलांना कोट्यावधी रुपये खर्च करून आपली मायपुंजी परत मिळवण्यासाठी अहो रात्र संघर्ष करावा लागत आहे, अंधबधिर वनविभाग याबाबत मौन आहे. कोल्हापूर, नागपूर, भोपाळ या ठिकाणी वन विभागाच्या कार्यालयासमक्ष अहिंसा व शांततेच्या मार्गाने आंदोलन करून दुर्दशा झाली आहे. दरम्यान तेरा वर्षाच्या कालावधीत हा लढा निर्भिड निडर आणि ठामपणे लढणाऱ्या या महिलांना अनेक वेळा 25 लाख रुपयांपर्यंतची मागणी करण्यात आली. जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला, किंबहुना बनावट गुन्ह्यामध्ये अडकवल्याची सुद्धा पीडित महिलांनी सांगितले आहे.
पंचतारा महिला खान मजूर व औद्योगिक सहकारी संस्था मर्यादित टोप तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर या संस्थेच्या महिलांचा हा लढा दैनिक खोज मास्टर तसेच ग्रुप ऑफ मीडियाच्या वतीने अविरत सुरू राहणार उपेक्षित अन्याय पिढी त्यांना न्याय देण्यासाठी आमचा पोलखोल नावाचा सदर मागील सात वर्षांपासून सुरू आहे. वाचकांना नम्र विनंती आहे की आपल्या परीने या प्रकरणाची ईतंबूत चौकशी करून अन्यायपीडितांच्या पाठीशी उभे राहण्याचे करावे. 13 वर्षाच्या या प्रदीर्घ लढ्याची मालिका आपण निरंतर सुरूच ठेवणार आहोत.
पुणे विभागातील पुणे, सांगली सातारा,कोल्हापूर,सोलापूर बातमी प्रकाशन करिता
khozmaster@gmail.com या मेल आयडीवर तसेच 9766384661 या फोन नंबर वर पेपर -चॅनलसाठी बातम्या पाठवाव्यात . लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी www.khozmaster.com या संकेत स्थळाला भेट द्यावी.
पैशाची मागणी करणारे अधिकारी कोण..?
महिलांवर जीवघेणा हल्ला चढविणारा माईनमाफीया कोण..?
प्रगती बघून पुरुषी अहंकार जागृत होणारे असामाजिक तत्त्व कोणती..??
अशा सर्व प्रश्नांची उत्तर प्रत्येक भागात आपल्याला प्राप्त होणार.
तेव्हा खोज मास्टरच्या पोल खोल मालिकेला अचूक वाचन करण्यास विसरू नका.
क्रमशः
भाग -1
Users Today : 15