गजानन माळकर पाटील जालना जिल्हा प्रतिनिधी मंठा.
जालना येथे १ डिसेंबर रोजी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची सभा होणार आहे. सभेसाठी तालुक्यात सकल मराठा समाजाच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून गावागावांत कार्यकर्ते रॅली काढून मूळवाट्या देऊन बैठका घेत आहेत.
मंठा तालुक्यातील सर्वच गावांमधून जास्तीत जास्त संख्येने मराठा
समाजाने सभेसाठी हजर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहेत. तालुक्यातील विविध गावांमध्ये रॅलीद्वारे, प्रत्येक मंदिरात मीटिंग घेऊन, भेटी देऊन जागृती करण्यात येत आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मंठा तालुक्यातील केंधळी, खोराड सावंगी, लिंबेवडगाव, विडोळी, मंगरूळ,
खारी आर्डा, माळतोडी,तळतोडी,हेलस, यासह अनेक गावांमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण करून आंदोलनाची धग कायम ठेवण्यात आली आहे. मंठा तालुक्यातील येथे घरोघरी जाऊन मूळवाट्या वाटप करण्यात आल्या. येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नियोजित सभेबाबत माहिती देण्यात आली.